छायाचित्र -ईलीयास बावानी
पथक प्रमुख नायब तहसीलदार डॉ.राजकुमार राठोड नायब तहसीलदार कैलास जेठे यांची कारवाई
बेवारस वाळू जप्त करून केले पंचनामे वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी महसूल पथकाची 24 तास नदीकिनाऱ्यावर गस्त
श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्रावर अतिदुर्गम भागात असलेल्या मौजे सायफळ वाळू घाटासह वडसा पडसा नेर आणि चोले पेंड या वाळू घाटावरून खोदलेला वाळू घाट बुजवून वाळू चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाल्याने सहाय्यक जिल्हाधिकारी झेनिथ चंद्र दोंथुला तहसीलदार किशोर यादव यांच्या आदेशाने पथक प्रमुख नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी अर्ध्या रात्रीला जाऊन पोलीस बंदोबस्तात वादग्रस्त सायफळ घाटासह इतर घाटाला जाणारे सर्व रस्ते खोदून काढल्याने पुन्हा एकदा त्यांच्या धडक कारवाईची वाळू तस्करांनी धास्ती घेतल्याचे दिसत आहे.
गेल्या आठवड्याभरापासून तहसीलदार किशोर यादव यांच्या आदेशाने पथक प्रमुख नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड ,नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रावर असलेले अधिकृत अनधिकृत सर्वच वाळू घाटावरील रस्त्यावर जेसीबी द्वारे मोठे खंदक खोदणे सुरू केले असून वाळू तस्करीवर आळा घालण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करीत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक ठिकाणी वाळू तस्कराकडून धमक्या मिळणे वाहनाचा पाठलाग करणे चोरी करणारे वाहन मिळू न देणे असे प्रकार सर्रास होत असून अनेक ठिकाणी पुढारी आणि स्वयंघोषित पत्रकाराकडूनही विनाकारण मानसिक त्रास दिला जात असल्याच्या घटनात वाढ झालेली असल्याने सा जिल्हाधिकारी झेनीत चंद्र दोंथुलां यांनी तात्काळ पथक प्रमुखांना अग्नि शस्त्र आणि पोलीस बंदोबस्त 24 तास द्यावा अशी मागणी होत आहे.
सहाय्यक जिल्हाधिकारी झेनिथ चंद्र दोंथुलां तहसीलदार किशोर यादव हे वाळू तस्करांच्या मुळावर उठल्याने वाळू तस्करी जवळपास बंद झाली आहे महसूल विभागाने वाळू तस्कर विरोधात धडक कारवाया सुरू ठेवल्याने वाळू तस्करांनी पथक प्रमुख नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड नातह कैलास जेठे यांनी खोदलेले वाळू घाट बुजवून पुन्हा वाळू चोरी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती मिळताच 24 तास नदीकिनाऱ्यावर गस्त करून संभावित सर्वच ठिकाणचे नदीपात्रात जाणारे रस्ते खोदून काढले असून येणारे जाणारे व्हीआयपी आणि त्यांचे बंदोबस्त तसेच वाळू तस्करीवर आळा घालण्यासाठी रात्री बेरात्री नदीपत्रात जंगलात एकटेच जावे लागत असल्याने अधिकाऱ्यांचे जीवाला धोका निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तात्काळ एक नवीन वाहनासह अग्नीशास्त्र बाळगण्याचे परवानगी तात्काळ देऊन वाळूघाट हरास करत घरकुलधारकांना पाच ब्रास मोफत वाळू देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी होत आहे.