Chandur railway police | चांदूररेल्वे पोलीसांची अंमली पदार्थ करणा-यावर धडक कारवाई

 


पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे यांची अंमली पदार्थावर धकड कारवाई



चांदूररेल्वे:- दिनांक ०६/०४/२०२५ रोजी गोपणीय माहिती मिळाली की, दोन इसम हे गांजा नावाचे अंमली पदार्थ घेवुन मोटर सायकल ने तळेगाव दशासर कडुन राजना फाटा चांदुर रेल्वे येथे येणार आहे अशा माहीती वरून शहानिशा केली असता दोन इसम गाजा नावाचे अंमली पदार्थ विकी करण्याकरीता स्वतजवळ बाळगुन दुपारनंतर येणार आहे अशी खात्रीशिर माहीती मिळुन आल्याने मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग चांदुर रेल्वे यांचे परवानगीने तळेगाव रोडने संशयीत इसमाचा शोध घेत असतांना ग्राम राजना फाटा येथे दोन इसम दोन पांढ-या रंगाच्या बोरीसह एक काळया रंगाची बजाज पल्सर क MH 27 BU 2688 सह संशयीत रित्या मिळुन आल्याने नमुद दोन्ही इसमाजवळील दोन पांढ-या बोरीची पाहणी करून झडती घेतली असता त्यामध्ये एकुण २१.१८५ किलोग्रॅम गांजा कि ४,२३,७०० रू, बजाज पल्सर क MH 27 BU 2688 सह कि ६०,०००/रू, दोन मोबाईल कि १८,००० रू असा एकुण ५,०१७०० रू चा माल जप्त करण्यात आला. आरोपी नामे १) मनोज वामनराव मुद्रके वय ४८ वर्ष रा वडगाव राजदी ता चांदुर रेल्वे जि अमरावती ह.मु. श्रीहरी नगर दत्तापुर ता.धामनगाव रेल्वे जि अमरावती २) खेळविंद्र राजारामजी ईटीवाले वय ५२ वर्ष रा.गुजी ता धामनगाव रेल्वे जि अमरावती यांना ताब्यात घेण्यात आले. सदर ठिकाणी अंमली पदार्थची नियमानुसार जप्ती पंचनामा करण्यात आला व पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे येथे अपराध क ११५/२५ कलम ८ (सी), २० (ब), (ii) (सी), २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोदविण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अमरावती ग्रामिण, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीस पोलीस अधिकारी. अनिल पवार, यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक अजय आकरे, सपोनि शरद आहेर, पोउपनि नितेश आझडे, श्रेपोउपनि नंदलाल लिंगोट, पोलीस अंमलदार शिवाजी घुगे, नितीन शेंडे, पवन घरडे, गजानन वाघमारे, प्रशांत ढोके, अश्विनी आखरे व चालक पोकों चंद्रकात गाडे यांचे मदतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post