सुदैवाने कुठलीही जीवीतहानी नाही मात्र शकुंतलेच्या आठवणी जळाल्या
मूर्तिजापूर - ब्रिटीश काळापासून गोरगरिबांची लेकुरवाळी अशी ओळख असलेल्या शंकुतलेची मालमत्ता बेचिराख झाल्याची घटना दिनांक ७ एप्रील रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर असलेल्या नॅरोगेज रेल्वे प्लॅटफॉर्म नजीक च्या लोको शेड परिसरात उन्हाच्या तीव्रतेने भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत केल्या कित्येक दिवसांपासून उभ्या असलेल्या लोको शेड मधील रेल्वे डबे, इंजिन साहित्य व परिसरातील वृक्ष जाळून खाक झाले.
घटनास्थळी नगरपरिषदेचे अग्निशमक दल व आर पी एफ चे निरीक्षक सुनील कुमार सिंह, एस. एन रॉय यांच्या सह आरपीएफ चे जवान दाखल झाले असून आग नियंत्रनात आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सदर आगीत कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी रेल्वेचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नेमक आग लागण्या मागचं कारण अद्याप स्पष्ट झाले नसलं तरी वाढत्या उन्हाच्या कडाक्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.