उपविभागीय अधिकारी यांना अवैध दारूबंदी बाबत निवेदन!!
परतवाडा/ संतोष भालेराव
अचलपूर/ परतवाडा लगतच्या ढाबे व हाँटेलमध्ये राजरोसपणे अवैध दारू व इतर नशेच्या पदार्थांची विक्री सर्रास होत असल्याने शिवसेना उबाठा पक्षाचे शहराध्यक्ष सागर वाटाने यांच्या नेतृत्वाखाली व इतर जेष्ठ शिवसैनिकांनी उपविभागीय अधिकारी अचलपूर मार्फत पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण, उपविभागीय अधिकारी पोलीस, उत्पादन शुल्क अधिक्षक अमरावती, उत्पादन शुल्क अधिकारी अचलपूर यांना हे सर्व दोन नंबरचे धंदे बंद करून दोषींवर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की बियर बार चे लायसन्स असताना तिथे दारूड्या ग्राहकांना बसण्याची व्यवस्था करून दारू पिण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहेत यामुळे जुळ्या शहरातील तरूण वर्गातील मुले व्यसनाधीन होऊन मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी मार्गाने जात आहेत काही ठिकाणी सरकारी रोडवर अतिक्रमण करून एकापाठोपाठ एक धाबे उदयास आले आहेत याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
तरीही लवकरच हे काळें धंदे बंद करावे अन्यथा शिवसैनिक शिवसेना स्टाईलने आंदोलन उभारतील याची नोंद घ्यावी याप्रसंगी शिवसेनेचे शहरप्रमुख सागर वाटाने तसेच अभिजित काळमेघ ( अचलपूर विधानसभा समन्वयक) मनिष उर्फ टील्लु शर्मा ( उपतालुकाप्रमुख शिवसेना अचलपूर) गजानन फिसके ( शहरप्रमुख अचलपूर) सुधिर देशमुख ( उपशहरप्रमुख परतवाडा ) नितीन पोटे उपशहरप्रमुख शिवसेना परतवाडा, राजा पिंजरकर, मुरलीधर पडोळे हे वरिष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.