ईश्वरी रवींद्र लोहोटे एक कलागुणसंपन्न नृत्यांगना आणि गोड गळ्याची गायिका. जणू काही वैखरीवर सरस्वतीचा वास आहे की काय असं भासणारी गोड गळ्याची गायिका म्हणजेच ईश्वरी. आतापर्यंत ईश्वरीने अनेक गायन आणि नृत्य स्पर्धेत सहभागी होऊन अव्वल नंबर मिळवून अनेक पुरस्कार संपादन केले आहेत. तिच्या या कलेचे मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्रातून देखील कौतुक होत आहे. ईश्वरीने आपल्या कला कारकीर्द मध्ये विविधांगी कार्यक्रम केले असुन त्यांत एकेरी गायन स्पर्धा, ग्रीटिंग कार्ड बनविणे, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, समूह गायन स्पर्धा अशा अनेकविध कार्यक्रमांचा समावेश आहे. ईश्वरीने आतापर्यंत अशा अनेक स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शालेय शिक्षण पूर्ण करता करता आपली आवडही जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न ईश्वरीने केला आहे आणि आजतागायत ती करत आहे. आपली गायनकला आणि नृत्यकला अंगीकारत असताना ईश्वरीला सामाजिक कार्याची आवड देखील तितकीच महत्वाची वाटते. मग त्यासाठी अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात जाऊन गोरगरिबांना फळे वाटप, अन्नधान्य वाटप करत समाजोपयोगी कार्याची जाणीव ठेवली आहे. आणि एक बाल सामाजिक कार्यकर्ती म्हणून ईश्वराची गणना होते. आजवर ईश्वरीचे अनेक सेवाभावी संस्थेने कौतुक करून तिचा यथासांग सन्मान केला आहे त्यात प्रामुख्याने जनजागृती सेवा समिती, बदलापूर, साप्ताहिक भगवे वादळ, त्याचबरोबर तिच्या दैदिप्यमान कार्याची दखल घेऊन आर्यारवी एंटरटेनमेंट प्रॉडक्शनच्या तिसऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव मध्ये तिला नुकताच कलाभूषण हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बालवयातच कलात्मक धोरण अवलंबून सामाजिक बांधिलकी जपणारी ईश्वरी ही एक गुणी आणि हरहुन्नरी कलावंत आहे. ईश्वरीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
बालवयातच कलात्मक धोरण अवलंबून सामाजिक बांधिलकी जपणारी हरहुन्नरी कलावंत ईश्वरी रविंद्र लोहोटे ..!
byGavakadachi Batmi
-
0