राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे मागणी ; रंभापुर गट ग्राम पंचायतने घेतला ठराव
मूर्तिजापूर - तालुक्यातील रंभापूर गट ग्राम पंचायत ची मासिक सभा नुकतीच पार पडली असून या सभेमध्ये बौद्धगया मंदिर व्यवस्थापन कायदा १९४९ (BTMCA -१९४९) अंतर्गत महाबोधी महा विहर कमिटीत एकूण ९ सदस्य आहेत. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २५ नुसार सर्व व्यक्तींना धर्माचा दावा, आचरण आणि प्रचार करण्याचा अधिकार व धर्माचा सराव,उपदेश आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आहे. बौद्धागया मंदिर व्यवस्थापन कायदा १९४९ मुळे भारतीय संविधानाची पायमल्ली होत आहे त्यामुळे ग्राम पंचायत चे वतीने अशी मागणी करण्यात येत आहे की हा कायदा महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रद्द करावा म्हणून ग्राम पंचायत ने ठराव घेऊन तो ठराव राष्ट्रपती यांच्याकडे सादर केला आहे.जगभरात बौद्ध धर्माचे जन आंदोलन सुरू असून या आंदोलनाची दखल घेऊन महामहीम राष्ट्रपती यांनी महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य तथा माजी सरपंच प्रशांत इंगळे यांनी केली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच किरण प्रशांत इंगळे ,उप सरपंच वंदना सुधाकर टेकाडे, ग्राम विकास अधिकारी व्हि. आर. गावंडे, सदस्य सुनील विठ्ठल रोकडे, महादेव मोहिते, सदस्या अर्चना पंडित सोळंके,संगीता महेंद्र सावळे, चित्रा शिवानंद सुळे यांचिअपस्थिती होती.सभेचे सूत्रंचालन पाणी पुरवठा कर्मचारी राजू वानखडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संगणक परिचालक निलेश वानखडे यांनी मानले रोजगार सेवक अंबदास घोरमोडे यांची उपस्थिती होती.