गावाकडची बातमी| हातगावात शेतकऱ्याच्या घरावर चोरट्यांनी मारला डल्ला

 


सोन्याच्या दागिन्यासह लाखो रुपयांची रक्कम लंपास ; घरमालकाचा हृदय विकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू...!



शहर पोलिसांना चोरांचे आव्हान ; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर



मूर्तिजापूर - शहरापासून अगदी जवळच असलेल्या हातगाव येथे सायंकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान शेतकऱ्याच्या घरातील सोन्याच्या दागिन्यासह लाखो रुपयांच्या रोकडं वर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना घडली. या घटनेने मात्र तालुका हादरला असला तरी पोलिसांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित होत आहे.

                  प्राप्त माहितीनुसार रुपेश अशोकराव बोळे, वय २६ वर्ष राहणार हातगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे भाऊ वापरत असलेल्या खोलीचे कडी कोंडे तोडून सोन्यासह पाच लाख एक रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.या घटनेमुळे अशोक बोळे यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.मूर्तिजापूर शहरासह तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

चोरटे जणू पोलिसांना आव्हान देत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा करत असतांना देखील पोलीस प्रशासनास चोरट्यांचा शोध घेण्यास अपयश येत असल्याने अकोला पोलीसांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित होत आहे.

         फिर्यादीवरून पोलिसांनी तिन अनोळखी इसमाविरुद्ध कलम ३०५ (ए), ३३१ (३), ३(५), भा.न्या. सहीता नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, तपास अधिकारी पो हे कॉ सुरेश पांडे हे करित आहे.

Post a Comment

Previous Post Next Post