प्रशांत राठोड यांच्या पुढाकाराने मित्र मंडळाकडून जंगलात कृत्रिम पानवठे तयार करून टँकरद्वारे पाणीपुरवठा
श्रीक्षेत्र माहूर : मंत्रालयीन सनदी अधिकारी प्रशांत भाऊ राठोड यांच्या पुढाकारातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबविले जात असून त्यांचे पशुप्रेम जगजाहीरच आहे त्यामुळे जंगली जनावरे पाण्याच्या शोधात गाव खेड्यात येत असल्याने प्रशांत भाऊ यांच्या पुढाकाराने त्यांच्या मित्र मंडळाकडून जंगलात कृत्रिम पानवठे तयार करून त्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने प्रशांत राठोड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
सनदी अधिकारी प्रशांत भाऊ राठोड यांचे गेल्या अनेक वर्षापासून समाजकार्य कौतुकास्पद ठरत आहे त्याच्यात आणखीन भर पडावी तसेच सर्व जाती धर्माच्या दीनदुबळ्या गोरगरीब नागरिकांना त्यांच्याकडून सतत मदतीचा हात देण्यात येत असल्याने प्रशांत राठोड यांचे यांचा चाहता वर्ग प्रत्येक गाव खेड्यात निर्माण झाल्याने त्याचे स्वरूप आता मित्र मंडळात बदलल्याने प्रत्येक गाव खेड्यात मित्र मंडळ स्थापन होऊन त्यांच्याद्वारे समाज उपयोगी कार्यक्रमासह जंगली जनावरांसाठी ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जंगलाला लागून असलेल्या प्रत्येक गाव खेड्याच्या जंगल किनाऱ्यावर अथवा जिथे पाण्याचा टँकर जाईल तिथपर्यंत पाणवठे तयार करून करण्यात येत आहे
दिनांक 26 रोजी प्रशांत भाऊ यांनी सूचना दिल्याने मित्र मंडळाकडून जूनापानी चिक्रमवाडी या जंगलात वन्य प्राणी साठी पान्याची सुविधा करन्यात आली.वन्य प्राणी पान्या अभावि प्रत्येक वर्षी दगावल्या जात आहे हे लक्ष्यात घेत प्रशांत भाऊ मित्र मंडळाचे दीपक बाबुलाल चव्हाण यांनी स्वताचे पान्याचे टैंकर घेऊन जंगलात पोहचले ही चर्चा प्रत्येक तांडा वाडी वस्ति मधे पोहोचल्याने मित्रमंडळाकडून माहूर किनवट तालुक्यातील प्रत्येक जंगलातील प्रत्येक ठिकाणी कृत्रिम पानवटे तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मित्र मंडळाचे समन्वयक बंडूभाऊ राठोड पलाईगुडाकर यांनी सांगितले