शेतकरी चळवळीतील युवा शेतकऱ्याची आत्महत्या



अनेकांनी केल्या शोक संवेदना व्यक्त 


मूर्तिजापूर :- तालुक्यातील रसुलपुर येथील अल्पभूधारक युवा शेतकरी व शेतकरी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ता योगेश हरणे यांनी कर्जाला कंटाळून शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. २६ मार्च रोजी रात्रीच्या वेळी शेतात विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविणाऱ्या योगश हरणे यांच्या पत्नीचे चार महिन्यांपूर्वी कर्क आजाराने निधन झाले होते.     

           घरी जेमतेम शेती, डोईवर कर्जाचा डोंगर, त्यातही नापीकी , पत्नीचे आजारपण, मुलांच्या शिक्षणाचा खर्च सतत या विवंचनेत राहणाऱ्या योगेश प्रकाशराव हरणे यांनी शेवटी मृत्यूला कवटाळले, २६ मार्च रोजी रात्री ११ वाजता शेतात जाऊन विष प्राशन केले, दरम्यान त्यांना उपचारासाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला, योगेश यांनी अनेक शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, योगेश हरणे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते घेऊन मुर्तिजापूर तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांसोबत शेतकरी विरोधी व्यवस्थेच्या विरोधात आंदोलने केली, शेवटी तो हतबल झाला व मृत्युला कवटाळले. त्याच्या मागे दोन भाऊ, आई वडील व दोन चिमुकली मुले आहेत. या त्यांच्या आकस्मिक जाण्याने शेतकरी चळवळीची मोठी हानी झाल्याच्या अनेकांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.

Post a Comment

Previous Post Next Post