शिराळा येथील शेतकरी शरद भोवाळू यांनी खरेदी केलेले ट्रॅक्टर व पेरणी यंत्र
जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर
शिराळा :- शेतकर्यांचा कल आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीमध्ये शास्वत उत्पादन घेण्याकडे वाढत आहे.यंत्राचा उपयोग ते आपल्या शेतीत पुर्व मशागती पासून ते काढणीपश्चात वेगवेगळ्या कामांसाठी करीत आहेत.आधुनिक यंत्रसामुग्रीमुळे शेतीतील कामे वेळेवर व अचूक होवून खर्चात बचत होते. उत्पादनात गुणवत्ता वाढते आणि वाढत्या लोकसंख्येसाठी अन्न सुरक्षा अशा विविध बाबींवर मात करण्यासाठी यांचा फायदा होत आहे.
विशेष म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांना विविध यंत्रसामुग्री व औजारे खरेदीसाठी कृषि विभागाच्या वतीने अनुदान देले जाते.यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होतो.
शिराळा गावात कृषि विभाग- तालुका कृषी अधिकारी अमरावती यांच्या मार्फत कृषियांत्रिकीकरणाचा लाभ व व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रचार व प्रसिद्धी बरोबरच,"कृषि विभाग आपल्या दारी" हा लोकप्रिय व शेतकरीभिमुक उपक्रम राबविण्यात येत असतो.शेतकऱ्यांना दारावर तसेच बांधावर योजनेची माहिती मिळाल्यामुळे यांचा फायदा यांत्रिकीकरण व त्यावरील औजारे या घटकांचा अधिक प्रमाणात लाभ घेवून चांगले व अधिकचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.प्रशांत गुल्हाणे तालुका कृषी अधिकारी अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा गावातील कृषि सहाय्यक मारोती जाधव यांनी केलेले सुक्ष्म नियोजन या कामी आले आहे.
कृषि विभागाच्या वतीने आँनलाईन सोडती मध्ये विविध घटकांतर्गत लाभ घेतलेल्या गरजू शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळत असल्याने शेतकरी बांधव समाधान व्यक्त करीत आहेत.