ब्रम्हीचा अंशुमन जामनिक झाला जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी पात्र....!

 


गावच्या इतिहासात पहिल्यांदाच निवड ; सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव



मूर्तिजापूर - शहरातील प्रकाशवाट प्रकल्पात मोफत शिकवणी वर्गाचा लाभ घेतलेला व जिल्हा परिषद केंद्र शाळा ब्रम्ही येथे इयत्ता पाचवीत शिकणारा आणि ब्रम्हीतच वास्तव्याला असणारा अंशुमन शुद्धोधन जामनिक हा जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र ठरला आहे.

          जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा १८ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाली होती या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून ग्रामीण भागातील गोर-गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्तम संधी मिळाव्यात या उदात्त हेतूने न्यायमूर्ती अनिल कीलोर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या " प्रकाशवाट " प्रकल्पाचे पुढचे पाऊल " सुपर ५० " या शिर्षकाखाली यावर्षीपासून नव्याने सुरू केलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी मोफत शिकवणी वर्गाचा लाभ घेतलेला व जिल्हा परिषद केंद्र शाळा ब्रम्ही येथे इयत्ता पाचवीत शिक्षण घेणाऱ्या अंशुमन शुद्धोधन जामानिक ह्याने प्रतिकूल परिस्थितीमध्ये आई-वडिलांच्या, प्रकाशवाट प्रकल्पाची संपूर्ण टिम आणि शिक्षकांच्या परिश्रमाने परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. 



यावर शाळेच्या वतीने आई- वडिलांसह अंशुमनचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गट ग्रामपंचायत ब्रम्ही खुर्द अंतर्गत असलेल्या ब्रम्ही बाई व सर्वच गावच्या इतिहासात पहिल्यांदाच निवड झाल्याने सर्वच स्तरातून अंशुमनचे अभिनंदन व कौतुक होत आहे तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा मिळत आहेत.

         या यशाचे श्रेय आजी,आई- वडिलांसह, प्रकाशवाट प्रकल्पाची संपूर्ण टिम व शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद यांना देत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post