न्यायमूर्ती संजय मेहरे साधतील विद्यार्थ्यांशी संवाद...!

 







अकोला - न्यायमूर्ती संजय मेहरे अकोला येथील विधीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विधी क्षेत्रात करियर करण्यासाठी उपयुक्त महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

           अकोला शहरातील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने हॉटेल इंद्रप्रस्थ येथे ता. २९ मार्च रोजी सकाळी ‘लिगलफेस्टो’ विधी स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती संजय मेहरे उपस्थित राहणार आहे. यावेळी ते विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अकोला बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. चंद्रकांत वानखडे, उपाध्यक्ष ॲड. संतोष वाघमारे, सहसचिव ॲड.प्रदीप रोकडे, माजी सचिव ॲड.पप्पू मोरवाल, माजी सचिव ॲड. सुमित बजाज, अकोला बार असोसिएशनचे सदस्य ॲड.सुमेध डोंगरदिवे, ॲड.आकाश भगत उपस्थित राहणार आहेत. समाजामध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी व विधी शाखेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भवितव्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post