कलगांव ग्रामपंचायतच्या पुढाकाराने गावामध्ये लावले सी.सी.टिव्ही कॅमेरे

 


वाढत्या चोरींच्या घटनांना आळा लावण्यासाठी ग्रामपंचायतने लावली अनोखी शक्कल



  श्रीकांत राऊत ,यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी 


महागांव : तालुक्यातील कलगांव येथिल ग्रामपंचायतने गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातुन प्रत्येक चौकामध्ये सी.सी.टिव्ही काॅमेरे लावले आहे. महागांव तालुक्यातील सी.सी. टिव्ही लावणारी पहीली ग्रामपंचायत ठरली आहे. कलगांव येथे मागिल वर्षांपासुन चोर्‍यांचे प्रमाण वाढले असल्याने चोरींच्या घटनांना आळा लावण्यासाठी ग्रामपंचायतने ही अनोखी शक्कल लावली आहे. गावामध्ये सी.सी.टीव्ही लावल्याने गावातील चोऱ्यांचे प्रमाण कमी होणार आहे त्याचप्रमाणे कलगाव या गावांमध्ये एखादी घटना घडल्यास या माध्यमातून पाहता येणार आहे प्रमाण कमी होणार असून ग्रामपंचायतच्या या निर्णयामुळे गावातील नागरिकांना या सीसीटीव्ही कॅमेरा चा फायदा होणार आहे.




गावांमधील वाढलेल्या चोऱ्यांचे प्रमाण व कलगाव हे गाव स्मार्ट बनवण्याचे हिशोबाने गावातील प्रत्येक चौकामध्ये आम्ही सी.सी.टीव्ही कॅमेरे लावले आहेत. यानंतर गावात चोरीच्या घटना घडल्यास आरोपीचा शोध लावण्यासाठी पोलिसांना या सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याची मदत मिळणार आहे.

- श्रीधर भवानकर उपसरपंच कलगाव ता. महागांव जि.यवतमाळ


कलगाव ग्रामपंचायतने सी.सी.टीव्ही कॅमेरे लावण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. गावांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. सी.सी.टीव्ही काॅमेरामूळे चोरांच्या प्रमाणावर आळा बसणार आहे. ग्रामपंचायतने हा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. 

- बालाजी राऊत ग्रामस्थ, कलगाव ता. महागाव जि. यवतमाळ

Post a Comment

Previous Post Next Post