कोथळी बु आदिवासी महिलांचा मार्गदर्शन मेळावा व चर्चा सत्र संपन्न
बार्शीटाकळी : पश्चिम विदर्भात आदिवासी महिलांचे मागिल तीन महिनापासून सामाजिक प्रबोधन व मार्गदर्शन मेळावे सातत्याने चालू आसून आदिवासी महिला मध्ये सामाजिक परिवर्तन दिसून येत आहे.आंध आदिवासी जमातीतील महिलांचे आतापर्यंत अकोला, पातूर, मालेगाव, मंगरूळपीर या ठिकाणी महिला प्रबोधन व मार्गदर्शन मेळावे शहरी भागात संपन्न झाले. सदरील आदिवासी महिला मेळावे आता ग्रामीण भागात सुद्धा आयोजित करत आहेत. त्याच अनुषंगाने अकोला जिल्हातील कोथळी बु आदिवासी बहुल भागात दिनांक 2 मार्च रोजी आदिवासी महिलांचे आदिवासी महिला सक्षमीकरण व संघटन मार्गदर्शन मेळावा व चर्चा सत्र या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ महिला जिजाबाई झळके तर प्रमुख पाहुण्या म्हणून ,महिला प्रदेशाध्यक्ष आदिवासी विकास परिषदेच्या नंदिनीताई टारपे होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक नंदिनी टारपे आपल्या भाषांनातून म्हणाल्या आपल्या आदिवासी समाज व्यसन असेल आहारी जात आहे तसेच आदिवासी महिलावर मोठ्या प्रमाणात आत्याचार होत आहेत व शासकीय आदिवासी आश्रम शाळेत आत्याचर असे अनेक आत्याचर होतं आहे हे जर थांबायचं असेल तर आदिवासी महिलाचे सक्ष्मीकरण व संघटन होणे गरजेचे आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे सिताताई धंदरे (वाशिम जिल्हा महिला अध्यक्षा आदिवासी विकास परिषद), रेखा भोंडणे, रेणुका लोखंडे,(उपसरपंच) मंदा द्यावे जरिता लोखंडे, पुष्पा पावणे,सिताताई धंदरे, वंदना झळके,(माजी जिल्हा परिषद सदस्य अकोला)शशिकला बाई भोंडणे कौशल्याबाई नाईक,अनिता भोंडणे, सुमनताई कुरकुटे, कल्पना शिंदे यांची उपस्थिती होती.तर आदिवासी महिला सक्षमीकरण व संघटन मार्गदर्शन मेळावा मध्ये गौकर्णा डाखोरे मंदा झ्याटे अर्चना तिवाले, रेणुका लोखंडे, पुष्पा पवणे, सिताताई धंदरे वंदना झळके,अनिता भोंडणे निता धोंगडे, सिताताई धोंगडे, यांनी आदिवासी महिला सक्षमीकरण व संघटनांवर आपले मत व्यक्त केले.या कार्यक्रमाला कोथळी परिसरातील १५ते२०महिला बचतगटांची उपस्थिती होती.तसेच कार्यक्रमाला शेकडो महिलांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमामध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळा कोथळी येथील मुलींनी आदिवासी नृत्ये सादर करून महिलांचे मने जिंकली एकंदरीत कार्यक्रम चांगल्याप्रकारे पार पडला कार्यक्रमांचे प्रास्ताविक कल्पना शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन की रेश्मा भोंडणे यांनी केले.तर आभार प्रदर्शन कल्पना शिंदे यांनी व्यक्त केले.