गावाकडची बातमी | वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून



                   छायाचित्र-ईलीयास बावानी,माहूर



नायब तहसीलदार कैलास जेठे यांची रात्रीला कारवाई


श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्रावर अतिदुर्गम भागात असलेल्या मौजे सायफळ वाळू घाटावरून वारू वाळू चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असून खोदलेला वाळू घाट बुजवून वाळू चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाल्याने सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली तहसीलदार किशोर यादव यांच्या आदेशाने नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी अर्ध्या रात्रीला जाऊन पोलीस बंदोबस्तात तो वादग्रस्त सायफळ घाट खोदून काढल्याने पुन्हा एकदा त्यांच्या धडक कारवाईची वाळू तस्करांनी धास्ती घेतल्याचे दिसत आहे.


गेल्या आठवड्याभरापासून तहसीलदार किशोर यादव यांच्या आदेशाने पथक प्रमुख नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रावर असलेले अधिकृत अनधिकृत सर्वच वाळू घाटावरील रस्त्यावर जेसीबी द्वारे मोठे खंदक खोदणे सुरू केले.असून वाळू तस्करीवर आळा घालण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करीत असताना पडसा येथे कर्मचाऱ्यांना वाळू तस्करांनी धमकी दिली तर कालच अंनमाळ ते हडसणी रस्त्यावर वाळू तस्करांनी पथकाला सहा किलोमीटर पळवत गुंगारा देऊन ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना घडल्याने वाळू चोरीसाठी रस्ताच राहू नये या उद्देशाने नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी साय फळ घाटावर खंदक खोदण्याची कारवाई केली.सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली तहसीलदार किशोर यादव हे वाळू तस्करांच्या मुळावर उठल्याने वाळू तस्करी जवळपास बंद झाली आहे.

    महसूल विभागाने वाळू तस्कर विरोधात धडक कारवाया सुरू ठेवल्याने वाळू तस्करांनी नातह कैलास जेठे यांनी खोदलेले वाळू घाट बुजवून पुन्हा वाळू चोरी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने 


नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी सायफळ घाट गाठून अर्ध्या रात्री पोलीस बंदोबस्तात घाट वीस ते पंचवीस मीटर लांब आणि पंधरा ते वीस फूट खोल खोदून काढल्याने वाळू तस्करांची पंढरी घाबरली असून वाळू तस्करीत एखाद्या ट्रॅक्टर टिप्पर चालकाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आढळून आल्यास त्याचे घरूनही ट्रॅक्टर जप्तीची कारवाई करण्यात येईल आणि गुन्हा ही दाखल करण्यात येईल.


असा कडक इशारा तहसीलदार किशोर यादव

नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड नायब तहसिलदार कैलास जेठे उर्फ महाकाल यांनी दिला आहे. यावेळी सोबत पोलीस पाटील हेमंत गावंडे पाटील सपोउपनी संजीवन त्र्यंबकराव सानप होमगार्ड पुरुषोत्तम निवारे होमगार्ड वसीम पठाण सोबत होते.

Post a Comment

Previous Post Next Post