मूर्तिजापूर - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्ज माफी देण्याचा पुनर्विचार करावा अन्यथा अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
आम्ही सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकी पूर्वी जाहीर सभेत शेतकऱ्यांना दिले होते.
परंतु सादर झालेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निधीची तरतूद केलेली दिसत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून ३१ मार्च पूर्वी कर्जमाफी देण्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार करून पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
३१ मार्च पूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून नवीन वर्षात त्यांना पीक कर्ज वाटप घेण्यास पात्र करावे.
दिलेल्या आश्वासनाची पूर्ती न केल्यास येत्या १९ मार्च २०२५ रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील १५० गावातील शेतकरी तहसील कार्यालय परिसरात बेमुदत उपोषणास बसतील. यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती व्हावी, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा याकरता २१ फेब्रुवारी २०२५ आठवण मोर्चाचे सुद्धा आयोजन करून सरकार दरबारी संदेश पोहोचविण्यात आला होता.
प्रगती शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना मूर्तिजापूर, जनमंच नागपूर, आंतरभारती पुणे, न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुप, यंग बॉईज क्लब मूर्तिजापूर यांच्यावतीने मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
सदरच्या निवेदनावर स्नेहलता तायडे, कैलास साबळे, हरिदास फुके, विक्की तिवारी, तुषार हागे ,सुदामराव तायडे, निखिल गावंडे ,प्रफुल्ल मालधुरे, कृष्णकुमार शुक्ला, गोपाल तायडे, मुन्ना नाईकनवरे, नंदकिशोर बबानीया, सेवकराम लहाने, प्रमोद राजनदेकर, श्रीकांत वानखडे, सुरेश घाटे,अजय हांडे, जानराव मुळे, प्रा.सुधाकर गौरखेडे, डॉ.संजय उमाळे,हरिभाऊ वानखडे,अरुण बोंडे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.