डफळापुर जत येथील बेकायदेशीर जुगार अडयावर कारवाई करणेबाबत उपविभागीय अधिकारी सुनील सांळुखे जत विभाग यांना भाजप नेते दिपक माने यांचे कडुन निवेदन


सांगली{ नाशिक प्रतिनिधी डॉ शाम जाधव }जिल्ह्यातील डफळापुर (कडनुर) येथे श्रीपती शुगर अँन्ड पाँवर लि. आहे तेथे जवळच संरपच बार,हाँटेल जवळ शेडमध्ये मोठया प्रमाणात बेकायदेशीर जुगार अड्डा चालु आहे. सदर ठिकाण हे कर्नाटक सीमेजवळ असल्यामुळे येथे कर्नाटक राज्यातील, सांगली जिल्ह्यातील नागरिक येथे मोठया संख्येने येथे जुगार खेळण्यासाठी येतात बेकायदेशीरपणे पैसै लावुन जुगार खेळला जात आहे. यामध्ये सरासपणे तीन पानी, अंदर बाहर, कँसिनो जुगार खेळला जातो आहे. याठिकाणी जुगार खेळुन कित्येक युवक, नागरिक कर्जबाजारी झाले आहेत. देशोधडीला लागुन बरबाद झाले आहेत.तसेच याठिकाणी चोरून बेकायदेशीर पणे क्रिकेट चा सट्टा ही घेतला जात असल्याची माहिती मिळत आहे. येथे नेहमी सराईत गुन्हेगारांचा वावर असतो. ते नेहमी दारू व ईतर नशा करून येत असतात. याठिकाणी दंगा मस्ती चालु असते. सदर बेकायदेशीर जुगार अड्डा बाबत सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या भितीने तक्रार देण्यास कोणी नागरिक पुढे येत नाहीत. तरी संरपच हाँटेल लागुनच चालणारे जुगार अड्डा ची चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी भाजप नेते दिपक माने यांनी उपविभागीय अधिकारी सुनील सांळुखे (जत विभाग ) तसेच पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर जत पोलिस ठाणे यांना निवेदन देऊन केली.

Tags : #सांगली क्रिकेट बेटींग व जुगार विरोधी चळवळ #sanglikar #sanglipolice #bjpmahararashtra #everyonehights #DevendraFadnavis #सांगलीकर

Post a Comment

Previous Post Next Post