जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर
अमरावती : तालुक्यातील शिराळा येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान व समानता बरोबरच त्यांच्या योगदानाचे कौतुक व समाज हक्क आणि संधी मिळून देण्याच्या उद्देशाने ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो,कारण महिला शिवाय समाज अपुर्ण आहे, सक्षमीकरण ही प्रगतिशील समाजाची ऒळख आहे,शिक्षण,विज्ञान, राजकारण,क्रीडा,कला, व्यवसाय,कृषी,अशा प्रत्येक क्षेत्रात आज महिला आपल्या यशाची पताका फडकवत आहेत.
अशाच कर्तृत्वान महिलांचा शिराळा येथे प्रशांत गुल्हाने तालुका कृषी अधिकारी अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विभागाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून प्रमिला रामकृष्ण उके या शेतकरी महिलेंचा सत्कार करण्यात आला.
त्यांचे शेतीतील योगदान व काम करण्याची चिकाटी यामुळे त्यांनी शिराळा परिसरात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.त्यानी आपल्या शेतात वेगवेगळ्या पिका बरोबरच,भाजीपाला,फळपिके घेऊन,नव युवकासाठी,महिलांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
त्यामुळे त्यांचा कृषि विभागाच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाल श्रीफळ तसेच स्व: रामभाऊ भोवाळू मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट शिराळा च्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कृषि साहाय्यक मारोती जाधव यांनी उपस्थित महिलांना कृषि व कृषि संलग्न योजनां,ॲग्रीस्टॅक,पि एम किसान योजने बदल सविस्तर माहिती दिली या वेळी मोठ्या प्रमाणात महिला शेतकरी उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित प्रगतशील शेतकरी राजेश भोवाळू, आकाश शेंडे,आशिष उके, समाजसेवक डि,आर, वानखडे उपस्थित होते.