विर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकास जागा उपलब्ध करून द्यावी..
नांदेड, किनवट -: थोर क्रांतीकारक वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या १९२ व्या जयंतीदिनी किनवट / माहुर तालुक्यातील तमाम आदिवासी बांधवाच्या भावानांचा आदर करून किनवट येथील क्रिडा संकुलास थोर क्रांतीकारक विर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावे. तसेच विर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकास योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी आदिवासीच्या प्राचीन संस्कृती, ऐतिहासीक सामाजिक संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी व समाजात सामाजीक, परिवर्तनासाठी व नवयुवकाना सतत प्रेरणा मिळण्यासाठी सदरील क्रिडा संकुलास विर बाबुराव शेडमाके यांचे नाव देवून नामकरण करण्यात यावे..अशी मागणी आदिवासी युवा समाज बांधवांनी निवेदनाद्वारे मागणी केली.
यावेळी उपस्थित संतोष मरस्कोल्हे, अनिल कनाके,पवन मडावी, आशिष मडावी, बालाजी सिडाम, राम लोखंडे, बालाजी मेश्राम, कमलदास वेट्टी, शिवाजी सिडाम, श्रीकुमार मडावी, लक्ष्मण मडावी, संतोष कनाके, संदीप कनाके, अरविंद पेंदोर, अजय मेश्राम अन्य आदिवासी युवा समाज बांधव उपस्थित होते