शकुंतला रेल्वेचा विषय निकाली लावून ब्राडगेज करण्यात यावी- रेल बचाव समितीने श्रेया सिंघल विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी अमरावती यांना दिले निवेदन
अमरावती - विभागीय कार्यालय अमरावती येथे शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचे तथा विविध सामाजिक संघटनचे पदाधिकारी यांना विभागीय आयुक्त श्रेया सिंघल यांची भेट घेऊन सर्व समस्या विषद केल्या, शकुंतला रेल ही फक्त रेल नसून लाखो नागरिक यांच्या भावना त्यांच्या रेल ब्रांड गेज प्रति जुळली आहे, आयुक्त मॅडम ने पण सकारात्मक भूमिका घेऊन मी लवकरात लवकर वरिष्ठांशी संपर्क साधून परतवाडा येथे नक्की भेट देऊन आपली समस्या प्रति विचार करते ऐसे आशवस्त केले, त्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालयचे अधीक्षक तहसीलदार खटके यांना सुद्धा निवेदन देण्यात आले.यावेळी शकुंतला रेल बचावचे योगेश खानझोडे, राजा धर्माधिकारी, एस.बी.बारखडे, वसंतराव धोबे,दयाराम चंदेल सत्याग्रही सोबत होते.
गेल्या सात वर्षांपासून बंद असलेल्या शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेज रूपांतरासाठी संघर्ष करणाऱ्या शकुंतला बचाव सत्याग्रह समितीने 23 मार्च 2025 रोजी शहीद दिनाच्या दिवशी अचलपूर येथे चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज दिनांक 11 मार्च रोजी समितीची सलग 7व्या वर्षातील 33वी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत आंदोलनाच्या पुढील रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली. समितीने प्रशासनाला 12 मार्च रोजी लेखी पूर्वसूचना दिली आहे.
शकुंतला रेल्वेचे महत्त्व आणि सातत्याचा संघर्ष
अचलपूर ते मूर्तिजापूरदरम्यान धावणारी शकुंतला नॅरोगेज रेल्वे अचानक बंद झाली आणि तब्बल सात वर्षे ती पुन्हा सुरू करण्यासाठी संघर्ष सुरू आहे. ही रेल्वे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झाली, तर हा संपूर्ण परिसर आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक विकसित होईल. या मागणीसाठी 30 पेक्षा अधिक आंदोलने करण्यात आली असून, राष्ट्रपती, पंतप्रधान, रेल्वेमंत्री आणि राज्य सरकारकडे वारंवार निवेदने पाठवण्यात आली आहेत. मात्र, अजूनही शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
23 मार्चला होणाऱ्या आंदोलनाची भूमिका
शासनाने 21 मार्चपर्यंत शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेजसाठी निर्णय घेतला नाही, तर 23 मार्चला अचलपूर येथील चांदूर नाका, अमरावती रोडवर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करूनही सरकारने दुर्लक्ष केल्याने आता हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे सत्याग्रहींनी स्पष्ट केले आहे.
प्रशासनाला पूर्वसूचना
हे आंदोलन शांततेत होणार असले, तरी प्रशासनाने योग्य वेळी दखल घ्यावी, यासाठी 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती मार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन पाठवण्यात येणार आहे.
जनतेचे आवाहन
शकुंतला रेल्वे ही केवळ प्रवासी वाहतुकीपुरती मर्यादित नसून, हा लाखो लोकांच्या जागृतीचा आणि विकासाचा मार्ग आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन शकुंतला बचाव सत्याग्रह समितीने केले आहे.
23 मार्चला शहीद दिनी होणाऱ्या या ऐतिहासिक आंदोलनाची सर्वांनी नोंद घ्यावी आणि शकुंतला ब्रॉडगेजच्या मागणीसाठी एकत्र यावे!
सदर आढावा बैठकीत शकुंतला रेल बचाव सत्याग्रही योगेश खानझोडे, प्रसिद्ध कवी राजा धर्माधिकारी, राजेश अग्रवाल, दिपा तायडे, दयाराम चंदेल, राजेंद्र पांडे, किरण गवई, एस.बी. बारखडे, विजय गोंडचवर, राजेंद्र जयस्वाल, वसंतराव धोबे, संजय डोंगरे उपस्थित होते.