आमदार प्रविण तायडे यांचे सुद्धा वाहन रोकुन निवेदन देऊन अधिवेशन सत्र मध्ये मुख्यमंत्री यांना आमची मागणी निदर्शनास आणावी म्हणून केली विनंती
अहिंसात्मक दिशेने सलग 7 वर्षे 32 आंदोलन करणारी शकुंतला रेल बचाव समिती झाली शहीद दिनी आक्रमक
पूर्ण महाराष्ट्रला ज्ञात असणारी आझाद देश की गुलाम शकुंतला रेल्वे पुन्हा सुरू व्हावी, येथील सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी,व्यापारी,शेतमजूर यांना एकमेव ग्रामीण क्षेत्रात जोडणारे दळणवळण साधन उपलब्ध व्हावे याकरीता शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती गेल्या सात वर्षे पासून विविध असे शांतता पूर्ण आंदोलन तालुक्यात राबवित आहे.तरीसुद्धा शासन दरबारात सदर भजन कीर्तन आंदोलनची 32 टप्प्यात दखल न घेतल्याने आज रोजी शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पांजली, श्रध्दांजली अर्पण करत सकाळी 10 वाजता अमरावती- परतवाडा रोडवर विविध राजकीय-सामाजिक संघटनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले.यावेळी शकुंतला रेल बचावचे सत्याग्रही योगेश खानझोडे, गजानन कोल्हे, राजा धर्माधिकारी, दिपा तायडे, शारदा उईके, उज्वला माकोडे,कचरूसेठ पटवारी, राजेश अग्रवाल, राजकुमार बरडीया,कमल केजरीवाल, संजय डोंगरे, राजेंद्र मुंदे, वसंत धोबे, रामदास मसने, दयाराम चंदेल, शंकर बारखडे,नवीन प्रजापती, संतोष भालेराव, बाल्या उदापुरकर, संतोष नरेडी, राजेश पांडे सहित शेकडो सत्याग्रही उपस्थित होते.
राजकीय-सामाजिक संघटनाचे शकुंतला रेल चक्का जाम आंदोलनला समर्थन
नंदेश आंबडकर क्रांति ज्योती संघटन, नरेंद्र पडोळे शिवसेना उबाठा गट,आझादी बचाव आंदोलन, अचलपूर तालुका स्टोन क्रेशर, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, संकल्प सेवा समिती, महिला नागरी पतसंस्था, नवरंग पदयात्रा मंडळ, अचलपूर औद्योगिक वसाहत, शकुंतला रेल समिती यवतमाळ,ऑल ट्रेडर्स असोसिएशन सह अनेक सामाजिक संघटन व पदाधिकारी अभिजित कालमेघ, राजा पिंजरकर, विनय चतुर, गजानन फिसके, प्रकाश पुसदकर, सरपंच नारायण बोरेकर, पंकज शर्मा, संजय कडुकर, विवेक कडू, शाम निकम, दिलीप पाटाळवंशी सह पत्रकार मित्र संगठना यांनी पाठिंबा जाहीर केला.
मुख्यमंत्री यांना आमदार प्रवीण तायडे मार्फत शकुंतला रेल सुरू करण्याचे दिले निवेदन
रेल बचाव सत्याग्रह समितीचे चक्का जाम आंदोलन सुरू असताना,आमदार प्रवीण तायडे यांचे वाहण रोकून, रेल बचाव समितीने शकुंतला लवकर सुरू करण्या विषयी आमदार तायडे यांना मुख्यमंत्री नावे निवेदन दिले, आमदार प्रवीण तायडे यांनी सुद्धा सकारात्मक उत्तर देत लवकरच ही समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री सोबत चर्चा करतो, असे आश्वस्त केले, यावेळी कुंदन यादव, विशाल काकड, रुपेश ढेपे, प्रवीण तोंडगावकर, निलेश सातपुते, गिरीश भोयार उपस्थित राहिले.
शकुंतला बचाव चक्का जाम आंदोलनची समीक्षा योगेश खानझोडे व गजानन कोल्हे यांनी विषद केली तर आंदोलन सांगता शेवटी पोलीस दल यांच्या मध्यस्थीने केली गेली.