वाशी, नवी मुंबई (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)
राखी प्रकाश रामाणे फाईन आर्टस् या कला क्षेत्रात उभारी घेणारे ज्यांनी आपल्या वडिलांच्या सहकार्याने 2011 मधून जे जे आर्ट्स मधून डिगरी संपादन केली आणि अल्पावधीतच नावारूपास आलेले सालस व्यक्तिमत्व. राखी यांनी साल 2014 मध्ये आर. एल. भाटिया ह्यांच्या कंपनीमध्ये रुजू होऊन कलेची आवड जोपासली आहे. त्याचप्रमाणे 11 वर्ष गुरूंच्या सानिध्यात राहून आपलं इच्छित ध्येय हासील करण्यासाठी राखी रामाणे यांनी स्वबळावर दिपक सावंत ह्याच्या सहकार्याने स्वतःची माऊली क्रिएशन ही कंपनी चालू करून आपले ध्येय पूर्ण केले आहे. त्यांच्या या कार्याला जनतेचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत असुन मराठी कलाकारांनी सुद्धा त्यांच्या या कामगिरीवर प्रसन्न होऊन त्यांना उदंड प्रतिसाद दिलेला आहे. त्यांच्या या कार्याची विशेष दखल घेऊन काही लोकप्रिय कलावंतांनी त्यांच्या घराच्या सुशोभीकरणासाठी राखी रामाणे यांची निवड केली हे विशेष आहे.