परिपूर्ण अर्ज दाखल करावे तहसीलदार किशोर यादव यांचे निराधारांना आवाहन
288 पैकी 193 अर्ज मंजूर
श्रीक्षेत्र माहूर : माहूरच्या तहसील कार्यालयात तहसीलदार किशोर यादव यांच्या उपस्थितीत दिन 27 रोजी झालेल्या बैठकीत निराधारानी वेगवेगळ्या योजनात दाखल केलेल्या 288 अर्जा पैकी 193 अर्ज मंजूर करण्यात आले असून इतर संचिकात त्रुटी असल्याने निराधारानी पूर्ण कागदपत्र सहअर्ज दाखल करावें अन्यथा दलाला कडून लूट होण्याची संभावना असल्याने अर्ज अपूर्ण असल्यास थेंट मलाच भेटावे असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे
धडाकेबाज निर्णय घेऊन गोरगरिबांच्या कल्याणासाठी असलेल्या शासकीय योजनांची 100% अंमलबजावणी करण्यासाठी प्रसिद्ध असलेले तहसीलदार किशोर यादव यांनी दि 27 रोजी कार्यालयीन बैठक घेऊन निराधारानी वेगवेगळ्या योजना अंतर्गत तहसील कार्यालयात दाखल केलेल्या अर्जात संजय गांधी निराधार योजना 87 श्रावण बाळ योजना 191 इंदिरा गांधी निराधार वृद्धापकाळ योजना 10 असे एकूण 288 अर्ज प्राप्त झाले होते यापैकी छाननी आणि अंती तिन्ही योजनांमध्ये एकूण 193 अर्ज पात्र ठरले असून इतर अर्जामध्ये कागदपत्रांच्या त्रुटी असल्याने सदरील अर्जातील त्रुट्या पूर्ण करण्यासाठी संबंधिताना कळविण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार किशोर यादव यांनी दिली.
निराधार योजना अंतर्गत आधीच्या हजारो लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत असून निराधार योजनातील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे रक्कम 100% जमा झाली असून त्रुटीच्या दाखल झालेल्या अर्जातील निराधाराना कागदपत्राविषयी काहीही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन यावेळी तहसीलदार किशोर यादव यांनी केले यावेळी नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड महसूल सहाय्यक वैभव पांढरे आयटी असिस्टंट उदय वानखेडे यांचे सह कर्मचारी उपस्थित होते..