कर्जत(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)महिला या लक्ष्मी,सरस्वती,दुर्गा अशा देवतांपासून ते राणी अहिल्यादेवी,सावित्रीबाई,बहिणाबाई,सिंधुताई अशा मायभगिनींपर्यंत सर्व रुपांमधुन मानवतेच्या विश्वाला तीर्थस्वरुप करणा-या स्त्री शक्तीचाच एक वास्तव अंश आहेत.८मार्च हा सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो,त्याच अनुषंगाने जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने कर्जत हॅरिटेज रिसाॅर्टवर जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कर्जत हेरिटेज रिसाॅर्टच्या संचालिका विजयालक्ष्मी केशरवाला आणि सौ.प्रिती प्रदिप जोशी यांच्या हस्ते वुमन डे स्पेशल कापण्यात आला.याप्रसंगी सौ.प्रिती जोशी यांच्या हस्ते विजयालक्ष्भी केशरवाला यांना संस्थेचे सन्मानपत्र व संस्थेचा अहवाल प्रदान करण्यात आला.तसेच प्रिती प्रदिप जोशी,वंदना अशोक लंगडे,गंधाली गुरुनाथ तिरपणकर,ललिता ज्ञानेश्वर माळवदकर,मनिषा संजय वगळ,प्रिया प्रमोद जोशी,ज्योती पवार,प्रज्ञा शिंदे,अरुणा मुकणे यांना विजयालक्ष्मी केशरवाला यांच्या हस्ते संस्थेचा अहवाल,"आकर्षक सन्मानपत्र"गुलाबपुष्प प्रदान करुन या महिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सौ.प्रिती जोशी,सौ.प्रिया जोशी,सौ.वंदना लंगडे यांची समोयचित भाषणे झाली.जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी प्रास्ताविक केले.तसेच संस्थेचे जेष्ठ सदस्य प्रदिप जोशी यांनी सर्व समावेशक सकारात्मक मार्गदर्शन करुन सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.