कृषि विभागाच्या वतीने ॲग्रीस्टॅक योजनेचा प्रचार

              जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर 

 शिराळा  : केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात सुरू झाला आहे कृषि क्षेत्रात अमुलाग्र बदल घडविणारा उपक्रम म्हणजे, ॲग्रीस्टॅक.



             या अंतर्गत शेतकरी,ग्राहक, विक्रेते,आणि सरकार यांना एकत्र आणणारी एक क्रांतिकारक प्रणाली आहे, यामधून शेतकऱ्यांची ओळख निश्चित केली जाते,आणि शेतीच्या सर्व प्रक्रियांमध्ये अचूकता आणि पारदर्शकता आणली जाते.

      फाॅर्मर आयडी हा शेतकऱ्यांसाठी अव्दितीय ओळख क्रमांक आहे,तो ॲग्रीस्टॅक अंतर्गत तयार केला जातो, ज्यामध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक,जमिनीचा सातबारा ही माहिती समाविष्ट असते.

        फाॅर्मर आयडी ची आवश्यकता का आहे?,कारण सरकारी योजनांचा लाभ, पारदर्शक प्रक्रिया,आधुनिक तांत्रिक सहाय्य,अधिक उत्पादनक्षम शेतीसाठी मागदर्शन, यासाठी याचा उपयोग होतो..

    यासाठीच ॲग्रीस्टॅक अंतर्गत व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रशांत गुल्हाणे तालुका कृषी अधिकारी अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा येथील कृषि साहाय्यक मारोती जाधव यांनी येथील ग्राहक सेवा केंद्रात जाऊन शेतकऱ्यांना योजने बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, यावेळी कृषि पत्रकार पवन पाटणकर, आकाश ऑनलाईन सेंटरचे प्रमुख आकाश शेंडे, व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post