स्थानिक तळेगाव दशासर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा येथे रमजान ईद चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना शीरखुर्मा युक्त दुध वाटप करण्यात आले व शाळेत दाखल असलेल्या मुस्लिम धर्मीयांच्या विद्यार्थ्यांना नवीन कपड्यांचा वाटप करून ईद चा सन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश धर्मनिरपेक्षता आणि सर्व धर्म समभाव हे मूल्य प्रत्यक्ष आचरणात आणणे हा असून
सर्व धर्माचे सण आणि उत्सवाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्याचा आदर व सन्मान सर्व विद्यार्थ्यांनी करावा हा आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक अरुण चव्हाण सचिन चव्हाण विष्णू राठोड विनोद राठोड सौ.देवयानी धुमाळ, माला फाळे, कु.स्नेहा सहारे, सविता गोठाणे ,संगिता पुनसे, कु.हेमलता राऊत, अर्चना जगताप ,कु.भाग्यश्री घोंगडे, कु.संध्या राठोड यांनी सहकार्य केले.


