महसूल विभागाच्या " जिवंत ७/१२ मोहिमेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा - तहसीलदार शिल्पा बोबडे

 




मूर्तिजापूर - तहसील कार्यालय व महसूल विभाग यांच्या वतीने १०० दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहिम राबविण्यात येणार आहे सदर मोहिमेची शासनस्तरावर महसूल मंत्री यांनी दखल घेवून सदर मोहिम संपूर्ण राज्यामध्ये राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत. यासाठी तालुक्यांतील नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी केले आहे.

                " जिवंत सातबारा मोहिम " अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणान्या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. या दृष्टीकानातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहिम राबविण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे.

त्यानुषंगाने दि.१ एप्रिल पासून मृतिजापूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये ग्राम महसूल अधिकारी यांचे मार्फत ग्रामस्तरावर चावडी वाचन सुरु करण्यात येणार आहे. तसेच

मयत खातेदार पांचे वारसनोंदी घेऊन, सातबारा मध्ये वारसांचे नोंदी अदयावत करून जिवंत ७/१२ मोहीम राबविण्यात येणार आहे. आपल्या गावच्या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे सादर करावेत व जेणेकरून ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) प्रकरणात स्थानिक चौकशी करुन मंडळ अधिकारी यांचे मार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजर करून वारस फेरफार तपार करतील. त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी हे वारस फेरफार वर निर्णय घेऊन त्यानुसार ७/१२ दुरुस्त करून सर्व जिवंत व्यक्ती ७/१२ वर नोंदविलेल्या जाणार आहेत.

----------------------------------

आवश्यक कागदपत्र 

• मयत खातेदाराचा मृत्यु दाखला,

वारसावाचत सत्य प्रतिज्ञालेख / स्वयं घोषणापत्र,

पोलीस पाटील / सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला,

सर्व वारसांची नावे, यय, पत्ते, दुरध्वनी क्रमांक/भ्रमणध्वनी क्रमांक रहिवासी बाबतचा पुरावा.

सदर मोहिमे अंतर्गत वारसाची नोंद करण्यासाठी ई हक्क प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्या करिता https://pdeigr. mahara shtra.gov.in/frmLogin या लिंकवर भेट द्या किंवा खाली दिलेला क्यु आर कोड हा स्कैन करा व सदर लिंक वर जाऊन आपला युझर आय डि व पासवर्ड टाकून अर्ज भरावा असे आवाहन तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post