विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
वाशिम - जिल्हा ग्रंथालय संघाच्या विद्यमाने वाशिम जिल्हा ग्रंथालय संघाचे २१ वे जिल्हास्तरीय आणि अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे २४ वे विभाग स्तरीय वार्षिक अधिवेशन दिनांक २२ मार्च २०२५ शनिवार रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे.
सदर अधिवेशनाचे उद्घाटन आमदार ॲड.किरणराव सरनाईक हे करणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथ मित्र प्रभाकर घुगे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून सुनील हुसे,सहाय्यक ग्रंथालय संचालक मराठवाडा विभाग छत्रपती संभाजी नगर , डॉ. राजेश पाटील,सहाय्यक ग्रंथालय संचालक ,अमरावती डॉ. सुरज मडावी जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अमरावती,कविता महाजन ,जिल्हा ग्रंथालय अधिकारी ,यवतमाळ, बालाजी कातकडे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, वाशिम,अतुल पाटील वानखडे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अकोला, प्रमुख अतिथी मध्ये शामराव वाहूरवाघ अध्यक्ष अकोला जिल्हा ग्रंथालय संघ, समाधान इंगळे,प्रमुख कार्यवाह अकोला जिल्हा ग्रंथालय संघ ,चंद्रकांत चांगदे,अध्यक्ष अमरावती जिल्हा ग्रंथालय संघ , राम देशपांडे,प्रमुख कार्यवाह अमरावती जिल्हा ग्रंथालय संघ,प्रमोद वानरे,सदस्य राज्य ग्रंथालय संघ, डॉ.अशोक फुटाणे,सदस्य राज्य ग्रंथालय संघ, मनोज रणखांब,अध्यक्ष यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघ, प्रशांत पंचभाई,प्रमुख कार्यवाह यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघ, प्रमुख उपस्थितीमध्ये नेमिनाथ सातपुते बुलढाणा प्रा.किसनराव वाघ बुलढाणा, सुनील वायाळ बुलढाणा, डॉ. राजेंद्र गनगे ,बुलढाणा, प्रा.कमलेश खिल्लारे बुलढाणा , पंजाबराव गायकवाड बुलढाणा, अनंत सातव बुलढाणा,रफिक कुरेशी बुलढाणा,विष्णू इंगळे बुलढाणा, प्रल्हाद इंगळे यवतमाळ इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सार्वजनिक ग्रंथालय यांचे सर्वांगीण कामकाजाचे स्वरूप, तपासणी बाबत अद्यावत अभिलेख आणि ग्रंथालयाचे इतर समस्या यासंबंधी मार्गदर्शन मिळणार असून या दुसऱ्या सत्राच्या अधिवेशनामध्ये गजानन कुरवाडे,विभागीय ग्रंथालय निरीक्षक अमरावती , दीपक गेडाम , जिल्हा ग्रंथालय निरीक्षक अमरावती ,राजेश कोलते जिल्हा ग्रंथालय निरीक्षक अकोला,नरेश काळे जिल्हा ग्रंथालय निरीक्षक ,वाशिम इत्यादी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत या अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक ग्रंथालयाच्या दोन प्रतिनिधींच्या प्रवास खर्च अनुदानास पात्र राहणार आहे मात्र त्यापैकी एक ग्रंथालय सेवक असणे अनिवार्य आहे त्याचप्रमाणे प्रतिनिधी नोंदणी प्रतिव्यक्ती रुपये ३०० प्रमाणे प्रतिनिधी नोंदणी असून , प्रतिनिधी नोंदणी ही पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतंत्रपणे करणे आवश्यक आहे या अधिवेशनाकरीता उपस्थित राहून प्रतिनिधी नोंदणी करणाऱ्या ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थिती प्रमाणपत्र ,अधिवेशन फाईल आणि अधिवेशनाची पिशवी इत्यादी साहित्य मिळणार आहे करिता अमरावती विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ग्रंथालयाचे पदाधिकाऱ्यांनी या अधिवेशनाला जास्तीत जास्त संख्येने हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन प्रा.भाऊसाहेब काळे स्वागताध्यक्ष तथा अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ ,वाशिम आणि डॉ सिताराम नालेगावकर स्वागताध्यक्ष तथा प्रमुख कार्यवाह अमरावती विभाग ग्रंथालय संघ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे .