वाशीम,कैलाश बनसोड : वाशीम जिल्हा मध्ये दि.30 मार्च रोजी एक अविस्मरणीय उदघाटन सोहळा संपन्न होतं आहे तो आहे परांडे क्लिनिक च शुभारंभ हे क्लिनिक पुसद रोड वाशिम श्रीहरी कॉम्प्लेक्स मध्ये आहे त्यासाठी येथे वाशिम जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर उपस्थित राहत आहेत तर विशेष म्हणजे येथे कोणत्याही लोकं प्रतिनिधी विना उद्घाटन आहे, उद्घाटन, म्हंटले की त्या कार्यक्रमात मोठा लोक प्रतिनिधी हस्ते रिबीन कापून किंवा केक कापून सोहळा पार केला जातो तर अशा कार्यक्रम मध्ये लोकं प्रतिनिधीची काय वाटा असतो..? तरी देखील लोकं प्रतिनिधी हस्ते रिबीन कापून सोहळा पार पडला जातो तर ती आता फॅशन झाली असुन खऱ्या जवाबदारी पारपाडणाराला विसरत असल्याचं चित्रं आहे. खरी जबाबदारी व कर्तव्ये पार पाडणारे आई वडीला पेक्षा कोणाचेही काही मोठें उपकार नसतात आणि योगदान सुद्धा....म्हणून डॉक्टर सुमित परांडे व पूजा परांडे यांनी आई वडिल गट शिक्षण अधिकारी गजानन परांडे व सुनीता परांडे यांचे हस्ते परांडे क्लिनिकचे उद्घाटन करण्याचें योजले आहे. त्या मुळे या डॉक्टरराचे आदर्श पालक प्रतिदिसून येत आहे. तर सुमित परांडे आणि पूजा परांडे यांचे कर्तव्ये पारायांता दिसून येते..