बुद्धगया मुक्तीसाठी वेळप्रसंगी रक्त सांडले तरी चालेल


                 छायाचित्र -ईलीयास बावानी 


     भीम टायगर सेनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांचे प्रतिपादन 

                    

श्रीक्षेत्र माहूर : बुद्धगया मुक्ती साठी सर्व समाज बांधवा सह हितचिंतकांना सोबत घेऊन आंदोलने सुरू असून वेळप्रसंगी रक्त सांडले तरी चालेल भीम टायगर सेना जोपर्यंत बुद्धगया थोतांड कर्मकांड पिंडदान करणाऱ्या लोकांपासून मुक्त होनार येणार नाही तो पर्यंत महाराष्ट्र सह भारत भर रस्त्यावरच आंदोलन करून थेट बिहार सरकारला मजबूर करून कायदा बदलविल्या शिवाय स्वस्त बसणार नसल्याचे प्रतिपादन भीम टायगर सेनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी माहूर येथील पत्रकार परिषदेत केले.

भीम टायगर सेनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके हे एका कार्यक्रमासाठी माहूर येथे आले असता पत्रकारांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी राष्ट्रपाल सावतकर ,अंबादास हरणे ,शुद्धोधन हरणे ,अनिल शेळके, समाधान कांबळे, प्रवीण बरडे, शंकर भालेराव, राजू दराडे राहुल भगत, रफिक भाई शेख ,राहुल कांबळे ,बाबाराव दवणे तसेच पत्रकार गणेश खडसे इलियास बावाणी यांचे सह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की इसे 528 पूर्वी भगवान गौतम बुद्धांनी बुद्धगया येथे घोर तपश्चर्या करून मानवी जिवन आनंदी होण्यासठी दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला होता. या नंतर सम्राट अशोकाने बुद्धगया येथे महाबोधी महा विहारचे बांधकाम करून या ठिकाणाला पवित्र ठिकाण बनविले होते त्यानंतर या ठिकाणी कर्मकांड करणाऱ्यां शैव महंतांनी ताबा घेत या ठिकाणचया बुद्ध मूर्तीचे विद्रुपीकरण केल्याने भगवान गौतम बुद्धांच्या मुख्य उद्देशांना हरताळ फासत या ठिकाणाला माया जमविण्याचे ठिकाण बनविले तर धर्माच्या नावावर देश-विदेशातील भाविक पर्यटकांना लुटण्याचे ठिकाण बनविले आहे. त्यामुळे जोपर्यंत ज्या प्रकारे हिंदू मंदिरावर हिंदूच पुजारी आणि विश्वस्त असून मुस्लिम धर्मियांच्या ठिकाणावर मुस्लिम पुजारी आहेत शिखधर्माच्या गुरुद्वारावर शिखधर्माचेच पुजारी आहेत जैन धर्माच्या मंदिरामध्ये जैन धर्माचे पुजारी ख्रिश्चन धर्माच्या चर्चमध्ये ख्रिश्चन पुजारी मग बौद्ध धर्म यांच्या पवित्र बौद्ध गया या ठिकाणी हिंदूचे पुजारी का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सदरील बुद्धगया अॅक्ट हा कायदा संविधान विरोधी असून संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरास तडा देणारा आहे बिहार सरकारने लवकरच या कायद्यात दुरुस्ती नाही केली तर भीम टायगर सेना बौद्ध बांधव आणि हितचिंतकांना सोबत घेऊन हायकोर्ट बिहार व सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे असे त्यांनी सांगितले बुद्धगया येथील बुद्धगया अॅक्ट मधून हिंदू महंत यांना काढून टाकण्यात यावे. या ठिकाणचे नियमात बदल करून सर्व व्यवहार बौद्ध बांधवांच्या स्वाधीन करावे हा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्व बौद्ध बांधव हितचिंतकांना सोबत घेऊन भीम टायगर सेना आपली कायदेशीर लढाई लढत राहील वेळ प्रसंगी रक्त सांडले तरी चालेल परंतु जोपर्यंत बुद्धगया मुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही असेही शेवटी दादासाहेब शेळके यांनी ठणकावून सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post