प्रकाश साबळे मित्र मंडळाचा आरोग्यदायी मदतीत महत्त्वाचा पुढाकार..!
पवन पाटणकर जिल्हा प्रतिनिधी
अमरावती,अचलपूर : धामणगाव(गढी)तालुका अचलपूर येथील एक तरुण , गंभीर आजाराने ग्रस्त रुग्ण अजय गजानन गहरे(वय 29)Hip-Replacement(boll) या आजाराने कित्येक महिन्यापासून चिंतेत होता. खाजगी रुग्णालयामध्ये यावरील शस्त्रक्रियेचा खर्च त्या अंदाजे दीड लाख रुपयापर्यंत सांगण्यात आला, त्यामुळे एवढा महागडा खर्च झेपणार नाही आणि आपली परिस्थिती बेताची आहे. यामुळे तो परिवारासहित चिंताग्रस्त होता.
तरुण रुग्ण अजय याने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाश साबळे यांच्या आरोग्य सेवे बाबत त्याला माहिती मिळाली व मित्राच्या मदतीने प्रकाश साबळे यांच्याशी संपर्क केला व सर्व आपबीती त्यांना सांगितली. प्रकाश साबळे यांनी वेळ न घालविता सदर तरुण मित्रास आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्वरित सावंगी मेघे हॉस्पिटलला ऍडमिट केले.
याबाबत हॉस्पिटलचे असिस्टंट डायरेक्टर डॉ.अभिषेक जोशी व श्री नाना शिंगणे पीआरओ, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे, वर्धा यांनी त्वरित दखल घेऊन रुग्णांच्या सर्व ट्रीटमेंट विविध योजनेच्या माध्यमातून विनामूल्य करून दिल्या.
अजय गहरे यांच्या वरील शस्त्रक्रिया सुखरूप पणे पार पडलेली आहे. त्यामुळे सर्व परिवार आनंदीत आहे. गहरे परिवार व त्यांचे नातेवाईक यांनी प्रकाश साबळे व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व टीमचे आभार मानले आहे....

