शिवजन्मोत्सव जवळ, पण महाराजांचा पुतळा अद्याप बंदिस्त; शिवप्रेमीत तीव्र नाराजी

 




किनवट : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवजन्मोत्सव 19 फेब्रुवारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, किनवट शहरातील शिवप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. कारण, महाराजांचा अश्वारूढ पुतळा अजूनही नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात बंदिस्त असून, महाराजांचा पुतळा उभारणीसाठी कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा 6 जून 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त ढोल-ताशांच्या गजरात शहरात आणण्यात आला होता. त्यावेळी शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढली होती. मात्र, तब्बल 20 महिने उलटूनही पुतळ्याच्या उभारणीच्या प्रक्रियेस गती मिळालेली नाही. वेळोवेळी प्रशासनाने वेगवेगळे कारणे दाखवून वेळ काढू पणाचे धोरण अवलंबलेले आहे.

शिवप्रेमींच्या भावना आणि जनतेचा उत्साह लक्षात घेता, पुतळा लवकरात लवकर उभारण्यात यावा, अशी मागणी होत आहे. मात्र, काही विघ्नसंतोषी झारीतील शुक्राचार्य व नगरपरिषदेच्या दिरंगाईमुळे हा ऐतिहासिक पुतळा अद्याप स्थापित होण्याच्या प्रतीक्षेतच आहे.

शिवजयंतीसारखा ऐतिहासिक सोहळा जवळ आला असताना, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बंदिस्त राहणे दुर्दैवी असल्याची भावना शिवभक्तांतून व्यक्त होत आहे. प्रशासनाने तत्काळ निर्णय घेऊन पुतळ्याच्या उभारणीस गती द्यावी अशी मागणी होत आहे.



 एखादं मोठं आंदोलन होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का अशी तीव्र प्रतिक्रिया शिवप्रेमी मधून ऐकवायास येत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post