शिराळा येथे संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त १३ ते २० फेब.ला श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन

                                                                                             जिल्हा प्रतिनिधी / पवन पाटणकर शिराळा                   

शिराळा:- येथील श्री संत गजानन महाराज संस्थान श्री क्षेत्र शिराळा येथे संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन १३ ते २० फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. 

कथा प्रारंभ १३ते १९ फेब्रुवारी ला सकाळी ९ ते १२ वाजता व दुपारी ३ ते ६ वाजता राहील.कथा वाचन परमपुज्य श्री निरंजन ( भाईजी ) महाराज श्री धाम वृंदावन यांच्या मधुर वाणीतुन होईल. १९ फेब्रुवारी ला दुपारी २ वाजता शोभायात्रा गावातील प्रमुख मार्गावरून दिंड्यासह काढण्यात येईल तर महाप्रसाद २० फेब्रुवारी ला २ वाजता राहील. 



दैनंदिन कार्यक्रमात - काकड आरती, हरिपाठ भजन संध्या राहील. होमहवन १९ फेब्रुवारी ला रात्री ८ वाजता राहील. प्रगटदिनाच्या दिवसी सकाळी ६ वाजता श्री संत गजानन महाराज यांच्या मुर्तीचाअभिषेक राहील.सकाळी १० वाजता काल्याचे किर्तन हभप शाम नारायणदास चौबे महाराज भक्तीधाम चांदुरबाजार यांच्या मधुरवाणीतुन होईल. दुपारी १२ वाजता मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल. 

सुत्रसंचलन कु. तृप्ती दिवाकरराव खाडे करतील. सत्काराचे अध्यक्ष खा. अनिल बोंडे राहील. सत्कार मुर्ती आमदार राजेशजी वानखडे, माजी खा. नवनीत राणा, माजी मंत्री प्रविण पोटे पाटील , सुनिल व-हाडे , विलास महल्ले, गाडगे महाराज मिशन मुंबई उपाध्यक्ष बापुसाहेब देशमुख, उदयभाऊ देशमुख फाउंडर व चेअरमन श्री चक्रधर गृप अमरावती , कृउबास सभापती हरिष मोरे , कृउबास उपसभापती भैय्यासाहेब निर्मळ, कृउबास संचालक किशोरजी चांगोले , कृउबास संचालक सतिशजी गोटे, कृउबास संचालक प्रतापराव भुयार, गजानन कोकाटे, प्रशांत काळबांडे, बाळासाहेब अलोणे, ओमप्रकाश टंडन चांदुरबाजार, तर प्रमुख उपस्थिती सरपंचा कु अंकिता मिं तायडे उपसरपंच अनिकेत खाडे , अनंतराव उर्फ राजाभाऊ देशमुख, महाराष्ट्र शिक्षण समिती शिराळा अध्यक्ष मनोजभाऊ देशमुख, कृउबास संचालक मिंलिंद तायडे, कृउबास संचालक अलकाताई शि. देशमुख, डॉ.गोपाळराव गंधे , भगवंतराव भस्मे, राजु उर्फ अनिल गंधे, जयंत आमले, मंगेश काळमेघ, शिवाजी खाडे उपस्थित राहतील. तरी शिराळा परिसरातील भाविक भक्तांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती आयोजका तर्फे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post