श्रीकांत राऊत, यवतमाळ
महागांव : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून यामध्ये महागांव तालुक्यातील तीवरंग ग्रामपंचायतची पोखरा योजनेत निवड झाली आहे. पोखरा योजना म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ही योजना गावस्तरीय विकासासाठी राबविली जाते. या योजनेतून गाव विकास आराखडे तयार केले जातात. या आराखड्यात नैसर्गिक साधनांचा योग्य वापर आणि बाजारपेठेतील सुधारित प्रवेश यांचा समावेश असतो. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना तुषार संच, इलेक्ट्रिक मोटर, टिंबक संच, ट्रॅक्टर इत्यादी शेती उपयोगी साहित्य दिली जाते. पोखरा योजनेअंतर्गत सर्वसामान्य प्रकल्पाला पन्नास टक्के अनुदानावर अनुदान दिले जाते.
गावाचा विकास हाच माझा ध्यास !
पोखरा अंतर्गत येणाऱ्या सर्वांना लाभार्थ्यांना उचितपणे लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचवण्याचा व त्यांचा सर्वांगीण विकास करिता मी कट्टीबद्ध असेल.
- जयश्री राठोड, सरपंच, तिवरंग, ता.महागांव, जि.यवतमाळ.


