मुंबई(गुरुनाथ तिरपणकर)आगरी सेवा संघ,प्रभादेवी येथे आगरी महोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी पत्रकार सतीश पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.या आगरी सेवा संघाची स्थापना१९३५साली झाली असून दरवर्षी आगरी महोत्सव मोठ्या थाटात व दिमाखात साजरा केला जातो.अनेक समाज बांधव वेगवेगळी वेशभूषा करून वाजत गाजत प्रभादेवी खाडा परिसरात एकवीरादेवीची पालखी मिरवणूक काढण्यात येते.
याप्रसंगी विविध क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.पत्रकार सतिश पाटील यांचा सत्कार केल्याबद्दल त्यांनी ख्यातनाम जेष्ठ कवी आगरी सेवा संघ प्रभादेवीचे अध्यक्ष प.सा.काका म्हात्रे यांचे आभार मानले.