लॉटरी विक्रेत्यांची विजयी सभा हक्कासोबत कर्तव्यही पार पाडूया :सातार्डेकर

 


मुंबई (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

वैभवशाली परंपरा असलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचे संकट आता टळले आहे. रोजगाराचा हक्क मिळाला असला तरी विक्रेत्यांनी यापूढे कर्तव्यभावनेतून राज्य लॉटरीची विक्रमी विक्री करावी असे आवाहन लॉटरी विक्रेत्यांचे जेष्ठ नेते विलास सातार्डेकर यांनी केले असून लॉटरीला अभय मिळाल्याबद्दल सातार्डेकरांचा सत्कार सोहळा विक्रेत्यांनी केला.

धर्मवीर लाॅटरी विक्रेता सेवा संस्था ठाणे (रजि.)तर्फे व वर्षा लॉटरी एजन्सीच्या पुढाकाराने विलास सातार्डेकर यांनी लॉटरी वाचविण्याचा केलेल्या यशस्वी प्रयत्नाबद्दल सत्कार `धर्मवीर प्रवाहाचे संपादक शिवाजी कोळी यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाध्यक्ष महेश कोळी यांनी प्रास्ताविक भाषण केले. लॉटरी संघटनेचे उपाध्यक्ष आत्माराम नाटेकर यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली तर अंध लॉटरी विक्रेत्यांचे नेते संभाजी डोंगरे यांनीही आपले विचार मांडले विलास पुजारा आणि दिनेश पुजारा यांनीही सातार्डेकर यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

संघटनेने केलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे सरकारला लॉटरी बंदीचा निर्णय मागे घ्यावा लागला हा लॉटरी विक्रेत्यांच्या एकजुटीचा विजय आहे आता आपली जबाबदारी वाढली आहे 

हक्कासोबत कर्तव्यही आपण सारे पार पाडूया असेही सातार्डेकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. गुढीपाडवा बंपर सोबतच यापुढील सर्व लॉटरीच्या तिकीटांची सर्वाधिक विक्री करुन सरकारच्या निर्णयाचे स्वागत करुया!असेही ते म्हणाले.

सरचिटणीस राजेश बोरकर, उपाध्यक्ष कमलेश विश्वकर्मा, सदस्य भावेश पवार यांनीही विक्रेत्यांशी संवाद साधला..शेकडो विक्रेत्यांनी यावेळी लॉटरी वाचवल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला. यावेळी धर्मवीर लॉटरी विक्रेता सेवा संस्था ठाणे (रजि) अध्यक्ष दिनेश पुजारा, सचिव महेश कोळी, खजिनदार विलास पुजारा, विनोद पवार ईत्यादी उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post