नाशिक : प्रतिनिधी डॉ शाम जाधव दिनांक १७/२/२०२५ फेब्रुवारी रोजी नाशिकला मनु मानसी महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री स्वामी समर्थ सभागृह मध्ये उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.संस्थापिका सौ मेघाताई राजेश शिंपी यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाची सुरुवात मनु मानसी संस्थेच्या ऑफिस चे उदघाटन आणि दिप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आशाताई मोरे. निर्भीड ज्योत न्यूज संपादक डॉ. आशाताई पाटील. ग्राहक रक्षक समिती संस्थापक अध्यक्ष अरविंद सोनवणे. बागलाण शिवसेना तालुका प्रमुख, प्रताप जाधव , प्रहार, दैनिक दिव्य मराठी पुढारी वृत्त संपादक अजय बिरारी, कवी अभिनेता गझलकार लेखक गायक. हे प्रमुख अतिथी लाभले. श्रेया वालझाडे हिने स्वागतगीत सादर केले. प्रमुख अतिथी यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यामध्ये शाल, ट्रॉफी गुलाबपुष्प आणि कुबेर झाड देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना मनु मानसी महिला सेवाभावी संस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त पत्रकार भुषण पुरस्कार देऊन ३५ पत्रकार बंधू भगिनी यांना ट्रॉफी सर्टिफिकेट शाल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, महिलांचे सबलीकरण ,अनाथ आश्रम ,वृद्ध आश्रम, गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू पुरविणे, घरगुती कामे देणे, बचत गट तयार करून कर्ज मिळवून देणे, स्वयं रोजगार विषयी मार्गदर्शन करणे, महिलांना व्यासपीठ मिळवून देणे, कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करणे, आरोग्य शिबीर आयोजित करणे आदी सामाजिक कार्य सेवाभावी वृत्तीने करणाऱ्या मनु मानसी महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजासाठी योगदान देणारे पत्रकार बंधू भगिनी साठी तृतीय वर्धापन दिनानिमित्त पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पत्रकार बंधु भगिनी यांना पत्रकार भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच मनु मानसी महिला सेवाभावी संस्थेच्या कार्यकारिणी पदाधिकारी, संस्थेचे सभासद यांना समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला अशी माहिती मनु मानसी महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका मेघाताई राजेश शिंपी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील "कर्तृत्ववान स्त्री-पुरुष" यांचा सन्मान सोहळा होतं आहे. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते शाल ट्रॉफी सर्टिफिकेट आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.मनु मानसी संस्थेच्या अंतर्गत केलेल्या कार्यकारणी पदाधिकारी आणि सदस्या यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.मनु मानसी महिला सेवाभावी संस्था संस्थापिका सौ मेघा राजेश शिंपी, यांनी मागील वर्षी संस्थेच्या अंतर्गत केलेल्या कार्याचा आढावा सादर केला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन रचना चिंतावार यांनी केले.
आभार प्रदर्शन ॲड.विनया नागरे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन सौ मेघा राजेश शिंपी.संस्थापिका, कविता पाटील. ब्रँड अॅम्बेसेडर, अॅड सौ. विनया नागरे कायदेशीर सल्लागार, धनश्री गायधनी कार्याध्यक्षा, सुरेखा घोलप कार्याध्यक्षा,मिरा आवारे सह कार्य अध्यक्षा सुनिता पाठक सह कार्यध्यक्षा, विशाखा खैरनार मार्गदर्शक सल्लागार, डॉ.सौ ज्योती केदारे सांस्कृतिक अध्यक्ष, रचना चिंतावार सांस्कृतिक अध्यक्ष कविता गायके आरोग्य आणि सेवा यमुना लिंगायत महिला संघटक अध्यक्ष,जया बुरूंगे महिला संघटक अध्यक्ष आणि मनु मानसी संस्थेच्या सर्व सभासद टीम मिळून करण्यात आले.
मनु मानसी संस्थेचे सचिव राजेश शिंपी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पत्रकार भुषण परास्कार्थी नावे सुभाष विठ्ठलराव कांडेकर दिव्य मराठी देवळाली कॅम्प प्रतिनिधी अनिल केदारे,पत्रकार ,भारत माझा न्यूज संजय मगन हिरे ,अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, संतोष राजगिर गिरी दैनिक देशदूत निफाड विभागीय कार्यालय प्रमुख तथा निफाड तालुका प्रतिनिधी संजय परमार.नाशिक न्युज, विजय कानडे, लोकशाही न्युज, सक्षम पोलीस टाईम ,विलास भालेराव. लोकमत आणि रोखठोक पोलीस टाईम्स चे संपादक, विजय बागुल.दक्ष न्युज चॅनल, मा.अफजल पठाण.दैनिक गावकरी, मंगेश कुळकर्णी.प्रेस रिपोर्टर स्टार न्यूज, लक्ष्मीकांत शिंदे. लोकमान्य न्यूज,शैलेंद्र साळी.पत्रकार आणि फोटोग्राफर, मा. श्री. लक्ष्मण सोनवणे. पत्रकार दैनिक प्रहार, दैनिक लोकनामा,योगेश खरे.झी २४ तास वृत्तवाहिनी , शेखर देसाई.ज्येष्ठ पत्रकार. लोकमत प्रतिनिधी, मुकुल कुलकर्णी. ए. बी. पी. माझा,सागर निकाळे .दै. महासागर, उपसंपादक लोकशाही न्युज चॅनल,सुनील शिंदे. ग्लोबल मराठी.पुणे, कृतिका मराठे दैनिक महाराष्ट्र लोकनामा सौरभ अमृतकर.. लोकमत पत्रकार प्रविण पवार. महाराष्ट्र २४ तास न्यूज, तुकाराम रोकडे. त्र्यंबकेश्वर. दैनिक लोकमत,विश्वास लचके. नाशिक लोकशाही न्युज चॅनल, गौरी प्रविण सुर्यवंशी. नाशिक. ए. बी न्युज वृत्त निवेदिका, तुषार गावंडे. देशदूत पत्रकार ,ॲड विनया नागरे . युवा मराठा,मुकुंद बावीस्कर. दैनिक भ्रमर, रामभाऊ आवारे. दैनिक महाराष्ट्र सारथी, ज्योती हंगे. के. बी मराठी न्युज, गुड्डू शेख.दिशा न्यूज रिपोर्टर, संदीप काकड. निर्भीड ज्योत न्यूज रिपोर्टर, रेखा संजय पवार सिलोड न्यूज ज्ञानेश्वर सांगळे. पञकार महाराष्ट्र ७ /१२ न्युज चैनल, डॉ. शाम हरी जाधव.निर्भीड ज्योत पत्रकार, रोखठोक पोलीस टाईम उपस्थित होते.






