कृषि,प्रदर्शनीमुळे शेतकऱ्यांना मिळाले हक्काचे व्यासपीठ

 

              जिल्हा प्रतिनिधी पवन पाटणकर 

 महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा), अमरावती यांचे वतीने येथील सांयसकोर मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय कृषि विकास परीषद व प्रदर्शनीला सलग चौथ्या दिवशीही शेतकरी व नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद पहायला मिळाला.

    चौथ्या दिवसांची शुरुवात परीसंवादाने झाली.यामध्ये सुरुवातीला विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पासाठी शेतकरी विकासासाठी शासनाची भूमिका, शेतकरी विकासासाठी मदर डेअरी व शासनाची भूमिका,रेशीम शेती, संत्रा पिक व्यवस्थापन,संत्रा पिकावरील एकात्मिक रोग व्यवस्थापन या विविध विषयावर परिसंवाद झाले.सांयकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात काॅमेडी फेम प्रविण तिखे यांचे हास्याचे तिखे बोल हा कार्यक्रम झाला.त्यांनी हास्य तरंग निर्माण करुन उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले.



   या प्रदर्शनीला सलग चौथ्या दिवशी विविध स्टाॅलला जवळपास २४००० शेतकऱ्यांनी व नागरीकांनी भेट देऊन विविध कृषिविषयक तंत्रज्ञानांची माहिती घेतली.

विविध स्टाॅल अंतर्गत २३ लाखांची उलाढाल झाली असे कृषि विभागाकडून सांगण्यात आले.

      या प्रदर्शनीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे,शेतकऱ्यांनी आपल्याच शेतीत पिकविलेला शेतमाल थेट विक्री करून ग्राहकांना उपलब्ध करून दिल्यामुळे अधिकचे चार पैसे शेतकऱ्यांना मिळाले,तसेच ग्राहकांना सुद्धा चांगले व दर्जेदार उत्पादने मिळाले त्यामुळे खर्‍या अर्थांने हि कृषि प्रदर्शनी शेतकरी व ग्राहकांसाठी एक प्रकारची पर्वणी ठरली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post