वाढदिवसाच्या निमित्ताने जोपासली सामाजिक बांधिलकी

 


शाळेतील विद्यार्थांना पेन व वही आणि गरजूंना राशन वाटप करून केला स्व. विशाल भाऊ देशमुख यांचा वाढदिवस साजरा



श्रीकांत राऊत यवतमाळ 


महागाव : शहरातील सामाजिक कार्यकर्ते स्व विशालभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्य जिल्हा परिषद शाळा कलगांव येथे विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करण्यात आले व गरजूंना राशन वाटप करून साजरा करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. संपूर्ण विश्व आपल्या वैदिक शास्त्राचे श्रेष्ठत्व स्वीकारत आहे. आपण सर्व त्यांची शैली स्वीकारण्यात अभिमान बाळगतो वाढदिवसाच्या दिवशी केक कापणे, मेणबत्ती लावणे , मघपान करणे, पार्टी करने या सर्व मॉडर्न पद्धतीचा निषेध करून गरजू लोकांमध्ये स्व.विशाल देशमुख यांचा वाढदिवस साजरा करुन सामाजिक बांधिलकी जपली. स्व. विशाल देशमुख मिञमंडळीनी त्यांच्या या वेगळ्या विचारसरणीचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 



या कामात त्यांना सागर कांबळे, श्रीकांत राऊत, किरण देशमुख, अजय शेळके, मंगेश सनगावकर, शुभम राऊत, ओंकार वानखेडे, योगेश राऊत, अविनाश चव्हाण, यश वाजीराबादे, आशिष वाजीराबादे, श्रीधर देशमुख, पृथराज राऊत, सोहम राऊत, संकेत कल्याणकर,ओम राऊत, शंकर राऊत, अस्टविनायक राऊत इत्यादी मित्र परिवार यावेळी उपस्थित होता.

Post a Comment

Previous Post Next Post