घटनेनंतर आरोपी पसार
मूर्तिजापूर - तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बारावीत शिकत असलेल्या १७ वर्षीय मुलीचा गावातील २२वर्षीय युवकाने विनयभंग केल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी समोर आली आहे .याप्रकरणी माना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हा पसार झाला आहे .
माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बारावीत शिकणारी १७ वर्षीय यवती ही तिच्या घरासमोर पायरीवर बसली असताना त्याच गावातील आरोपी अमित संजय गोंडाणे वय २२ वर्ष हा युवक तिच्या घरासमोर येवून तिला म्हणाला मी तुझ्या भावाला मारतो अशी धमकी पीडीतीला दिली. यावरून पीडीतीने म्हटले की तुझ्यात दम असेल तर मारून दाखव.... असे म्हटल्यानंतर आरोपी अमित संजय गोंडाणे याने अल्पवयीन पीडीतीचा हात पकडून घरात ओढत नेऊन आतून घराची कळी लावून विनयभंग केला. पीडितेने आरडाओरड केली असता तीचा चुलतभाऊ गच्चीवरून पायऱ्याने घरात आला असता आरोपी हा त्याला पाहताच आरोपी उडी मारून पळून गेला.
या प्रकरणी पीडीतीच्या फिर्यादीवरून माना पोलिस स्टेशनला बीएनएस कलम ७४,७६,३२९(४) सहकलम ८(१२) पास्कोनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन व महिला पोलीस जयश्री मेंढे हे करीत आहे.