दिव्यांग सांस्कृतिक स्पर्धेतआदिवासी कला शिक्षण संस्था किनवट संचालित अंध विद्यालय बोधडी (बु.) जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने जिल्हा समाज कल्याण कार्यलयाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा 4 फेब्रुवारी 2025 रोजी कुसुमताई चव्हांण सभागृह
नांदेड येथे नृत्य स्पर्धा पार पडल्या. या नृत्य स्पर्धेत जिल्ह्यातील अंध प्रवर्गातील सात शाळेनी सहभाग घेतला होता.
यामध्ये आदिवासी कला शिक्षण संस्था किनवट संचालित अंध विद्यालय, बोधडी (बु.) तालुका किनवटच्या अंध मुलीनी हिंदी गाण्यावर नृत्य सादर केले.
अंध विद्यालय बोधडी (बु.) राजेश टारपे अध्यक्ष,अंध विद्यालय बोधडी(बु)प्रकाश टारपे, सचिव (अभियंता
या नृत्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. असून यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांच्या हस्ते अंध विद्यालयाचे अध्यक्ष राजेश टारपे यांना स्मुर्ती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी अंध विद्यालयाचे माजी प्राचार्य व्ही. के. कांबळे व विशेष शिक्षक शुभम नारसूने होते.
यावेळी विशेष शिक्षिका सावित्रा करनेवाड यांनी नृत्य सादर करण्यासाठी परिश्रम घेतले.