पुन्हा चौकशी तथा पुनर्नियुक्तीच्या अटीशर्तीवर आरती (दहिवाडे )रामटेके यांचे बेमुदत उपोषण मागे..!
पोलीस प्रशासनाकडून तक्रारीच्या अनुषंगाने पुन्हा चौकशी करण्याचे आश्वासन...
गावाकडची बातमी उपसंपादक मंगला भोगे
वर्धा,आष्टी(शहीद) : आष्टी शहरात आरती (दहिवाडे) रामटेके या महिलेने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध पोलीस स्टेशन आष्टी समोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.
आरती दहिवाडे (रामटेके) आष्टी या महिला विकास महामंडळ द्वारा संचालित लोकसंचालित साधन केंद्र आष्टी (शहीद) येथे करार पद्धतीने व्यवस्थापक या पदावर असतांना साधन केंद्राच्या अध्यक्षा शारदा ढोले. रा. आष्टी तसेच उपजिविका सल्लागार निलेश कोहळे, रा. आष्टी यांनी जातीय द्वेषभावनेतून शिवीगाळ व अपमान केल्याप्रकरणी पोलीस स्टेशन, आष्टी येथे दि.२८ फेब्रुवारी २०२४ तक्रार करण्यात आली होती. परंतु वारंवार तक्रार देऊनही साधन केंद्राच्या अध्यक्षा शारदा ढोले यांच्याकडून पीडित माहिलेचा मानसिक छळ करून व्यवस्थापक या पदावरून करार न संपताच काढण्यात आले. त्यामुळे नाईलाजाने पीडित आरती (दहिवाडे)रामटेके यांनी २६ जानेवारी २०२५ रोजी पोलीस स्टेशन, आष्टी (शहीद) समोर बेमुदत उपोषण सुरु केले. त्यांनतर बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड. सुनील डोंगरे आणि कार्यकर्ते यांनी उपोषण स्थळाला भेट दिली. त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते अक्षय भगत, सागर मेंढे, निखिल खडसे, प्रशांत विघ्ने, सतीश बन्सोड, सुरेंद्र रामटेके व इतर कार्यकर्ते यांनी भेट देऊन उपोषणकर्त्याला न्याय मिळावा म्हणून प्रशासनावर दबाव बनवून, आष्टी पोलीस निरीक्षक बबन पुसाटे, तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून पुन्हा चौकशी करावी असे निवेदन देण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते पुन्हा चौकशी व पुरावे तपासून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन पोलीस विभागाकडून देण्यात आले. तसेच माविम, वर्धा जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे यांच्या कडून व्यवस्थापक पदावर घेन्यात येईल तसेच रखडले मानधन देण्यात येईल.
आणि पुन्हा घटनेच्या तपासणीच्या अटीशर्तीवर लेखी पत्रावर देण्यात आली. उपोषणाची सांगता पोलीस निरीक्षक बबन पुसाटे, माविम जिल्हा समन्वयक अधिकारी नरेश उगेमुगे यांच्या हाताने निंबू शरबत देऊन करण्यात आली.