श्रीकांत राऊत, यवतमाळ
महागांव : सहा महिण्याच्या प्रतीक्षेनंतर आता महागांव पोलिस स्टेशनमध्ये नव्यानेच जमादार निलेश पेंढारकर हे शनिवारी (ता.०१) रोजी रुजू झाले आहेत. यापूर्वी त्यांनी महागांव पोलिस स्थानकातील संवेदनशिल असलेल्या फुलसावंगी बिट, सवना बिट, मुडाणा बिट येथे आपले कर्तव्य बजावले आहे.
संवेदनशिल असलेल्या फुलसावंगी बिटमध्ये जमादार म्हणून त्यांचा सर्वाधिक कार्यकाळ राहिला आहे. त्यांनी त्यांच्या मागिल कार्यकाळामध्ये गंभिर गुन्हातील अनेक आरोपींना अटक करुन लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अतिशय संवेदनशिल असलेल्या फुलसावंगी बिटमध्ये त्यांनी पोलिस व जनतेचे संबंध अतिशय चांगले निर्माण केले होते व अराजक तत्वावर पोलिसांचा वचक जमादार निलेश पेंढारकर यांनी निर्माण केला होता. पोलिसांच्या व जनते सोबत सामाजिक बांधिलकी म्हणूनही अतिशय महत्वपुर्ण काम त्यांनी केले आहे. मगिल महिण्यामध्ये महागांव यथे पुर्वी मोबाईल गॅलरीमध्ये झालेल्या चोरीच्या प्रकरणात जमादार निलेश पेंढारकर यांनी महत्वाची जबाबदारी बजावली आहे. त्यांच्या या कर्तुत्वाची प्रचिती परत दिसेल यात काही शंका नाही. जमादार निलेश पेंढारकर महागांव पोलिस स्थानकात नव्यानेच रुजू झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.