संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त "अखिल भारतीय गोर बंजारा लेंगी स्पर्धा

 




किनवट - सारखनी फाटा येथे दिनांक 21,22,23,फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त "अखिल भारतीय गोर बंजारा लेंगी स्पर्धा व किनवट/ माहूर तालुक्याचे दिवंगत माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या



 स्मृति प्रीत्यर्थ अखिल भारतीय गोर बंजारा भजन स्पर्धेच तिन दिवशीय सांस्कृतिक आयोजन करण्यात आले आहे.

गोर बंजारा संस्कृतीला त्याच्या लोकसंगीताला वैश्विक प्रसिद्धि देण्याचा मानस अनेक वर्षांपासून या सांस्कृतिक कार्यकर्माचे तरुण आयोजक



 विशाल जाधव हे करित आले आहे.

या वेळेचा हा गोर बंजारा सांस्कृतिक सोहळा जागतिक दर्जाचा होणार आहे.

या बद्द्ल दुमत नाही या लेंगी महोत्सवाला विविध सामाजिक, कॉर्पोरेट क्षेत्रातील् व राजकारण आणि मराठी,तमिल ,हिंदी ,तेलगु चित्रपट सृष्टितिल अनेक दिग्गजाची मांदियाळी जमणार असून दहेली तांडा येथील तयार असलेल्या हेलीपेडचा सर्व पाहुणे मंडळीला वेळ वाचविण्याचा उपयोग होणार आहे ..




Post a Comment

Previous Post Next Post