जनजागृती सेवा संस्था"लोकमत एक्सलन्स अवाॅर्ड२०२५ने सन्मानित

 


मुंबई(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)गेल्या चार वर्षात जनजागृती सेवा संस्थेने उत्कृष्ट कार्य केलेले आहे.वृध्दाश्रम,बालकाश्रम,मतिमंद मुलांना मदत,आश्रमांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप,कोरोना काळात गरीब गरजु व्यक्तींना मदत,तसेच आदिवासी पाड्यावर दिवाळी फराळ वाटप,कपडे वाटप,शिवजंयती उत्सव,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती,महिला दिन,शिक्षक दिन,पत्रकार दिन,संस्थेचा वर्धापनदिन,महिला सक्षमिकरण,नवरात्रोत्सवात नवदुर्गांचा सन्मान,रक्तदान शिबिरात सहभाग,म्युझिक मंत्राच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम,वृक्षारोपण,स्वच्छता अभियान असे विविध समाजउपयोगी उपक्रम संस्थेने यशस्वीरित्या राबविले आहेत.गेल्या चार वर्षातील या उत्कर्ष कार्याची दखल लोकमत वृतपत्र समुहाने घेतली.आणि जनजागृती सेवा संस्थेची"लोकमत एक्सलन्स अवाॅर्ड२०२५साठी निवड केली.कफपरेड येथील प्रेसिडेंट हाॅटेल मधील आलीशान अशा प्रशस्त सभागृहात विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय श्री.राहुलजी नार्वेकर,आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकरजी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते"लोकमत एक्सलन्स अवाॅर्ड२०२५हा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर हेही उपस्थित होते.तसेच लोकमत वृत्तपत्र समुहाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.जनजागृती सेवा संस्थेने कणकवली,मालवण,चिपळूण,सावर्डे,कोंडमाळा,मांडकी या ग्रामीण भागात तसेच कर्जत,वांगणी,बदलापूर,अंबरनाथ,कल्याण,डोंबिवली,ठाणे,मुंबई शहर-उपनगर येथे विविध समाजउपयोगी उपक्रम राबविले आहेत.या सर्व ठीकाणी संस्थेचे कार्यकर्ते कार्यरत आहेत.त्यांच्या सहकार्या-यानेच कार्यक्रम यशस्वी करणे शक्य होत आहे.पुणे,बारामती,इचलकरंजी,यवतमाळ येथील संस्थाचे कार्यकर्ते कार्यक्रम घेण्यास उत्सुक आहेत.त्यांच्या बहुमोल सहकार्याने भविष्यात तेथे ही कार्यक्रम घेतले जाणार आहेत.जनजागृती सेवा संस्थेचे पदाधिकारी,सदस्य,सल्लागार तसेच जनजागृती सेवा संस्थेचे ग्रुप सदस्य यांचे मार्गदर्शन व सहकार्यामुळे उपक्रम राबविणे शक्य होत आहे.हा अवाॅर्ड सर्वांचा आहे.म्हणून"लोकमत एक्सलन्स अवाॅर्ड२०२५हा जनजागृती सेवा संस्था ग्रुप सदस्यांना समर्पित केला आहे असे संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी आवर्जून सांगितले.अवाॅर्ड मिळाल्याबद्दल संस्थेच्या पदाधिका-यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.शेवटी लोकमत एक्सलन्स अवाॅर्ड२०२५मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी लोकमत वृत्तपत्र समुहाचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post