उर्सात येणाऱ्या भाविकांना सुविधा द्या..तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन

 


छायाचित्र-ईलीयास बावानी

श्रीक्षेत्र माहूर श्रीक्षेत्र माहूर शहरात 5 मार्च ते दहा मार्चपर्यंत साजरा होणारा बाबा सोनापीर यांच्या उर्स मध्ये येणाऱ्या सर्व धर्मीय भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत दिनांक 27 रोजी सर्व विभाग प्रमुखां सह मान्यवरांना केले.



दरवर्षीप्रमाणे यावर्षी बाबा सोनातील दर्गा येथे दिनांक पाच ते दहा या कालावधीत उर्फ साजरा होणार असल्याने ते सर्व प्रकारचे मनोरंजनाची साधने खेळणी कपडा व इतर ठिकाणी लागणार आहे. रमजान महिना असल्याने कव्वालीचा कार्यक्रम होणार नाही त्यामुळे येथे लहान मुला बाळासह मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत. त्यांची सुरक्षा पाणी स्वच्छता आरोग्य व्यवस्था यासह इतर व्यवस्थाकडे सर्व विभाग प्रमुखांनी जातीने लक्ष द्यावे असे आवाहन केले. यावेळी तहसीलदार किशोर यादव नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी मुख्याधिकारी विवेक कांदे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता डी के भिसे स पो नि शिवप्रकाश मुळे मरावीमचे सहाय्यक अभियंता आर बी शेंडे मुजावर बाबीर फकीर मोहम्मद तसेच सज्जादा नशीन साजिद जहागीरदार डॉ ए डी आंबेकर आगारप्रमुख चंद्रशेखर समर्थवाड राज्य उत्पादन शुल्क चे आर पी पवार नपचे कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी तालुका आरोग्य सहाय्यक एस आर जोगपेटे मंडळ अधिकारी एस के साळसुंदर वनपाल मीर साजिद अली महसूल सहाय्यक सीपी बाबर यांचे सह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बाबा सोनापीर दर्गाह येथे प्रत्यक्ष जाऊन वरील सर्व मान्यवरांनी पार्किंगची जागा दर्गाह परिसर दुकानांची जागा दवाखाना पोलीस चौकी यासह इतर सर्व बाबींची पाहणी केली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंतराव कपाटे विजय आमले मनोज कीर्तने दत्ता शेरेकर इलियास बावाणी सौ पद्मा गिऱ्हे राज ठाकूर सौ सुरेखा तळणकर जयकुमार अडकिने व्ही एम मरेवाड भगवान कांबळे राजकिरण देशमुख राजू दराडे पी एस कांबळे जी डी जाधव रहीम चांद कुरेशी अकबर रज्जाक शेख सुरेश सातपुते चालक विलास शेडमाके यांचे सह अधिकारी कर्मचारी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post