नगर पंचायत माहूर 95 कोटी रुपयांचा अर्थसंकल्‍प मंजुर

 


                       छायाचित्र-ईलीयास बावानी

माहूर शहरातील तिर्थस्‍थळांना जाणारे रस्‍ते,पर्यटकानसाठी तलावांचे सुशोभिकरण, महापुरुषांचे स्‍मारके विकसीत करुन, विविध चौकाचे सुशोभिकरण करणार व माहूर शहर हे तिर्थक्षेत्राला साजेस शहर बनविणार. - नगराध्‍यक्ष फिरोज दोसानी




माहूर :- नगर पंचायत माहूर च्‍या सभागृहात दिनांकः-28/02/2025 रोजी नगराध्‍यक्ष फिरोज कादर दोसानी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली व मुख्‍याधिकारी विवेक भारत कांदे,उपाध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर नारायण लाड यांच्‍या व ईतर सदस्‍यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झालेल्‍या अर्थसंकल्‍पीय विशेष सभेत सन 2025-26 चा रक्‍कम रुपये 95,05,58,702/- एवढया रक्‍कमेचा व रक्‍कम रुपये 8,88,637/- रुपयांचा शिल्‍लकी अर्थसंकल्‍प मंजूर करण्‍यात आला.

दिनांक : 28/02/2025 रोजी नगर पंचायत माहूरच्‍या सभागृहात अर्थसंकल्‍पीय विशेष सभा संपन्‍न झाली. या सभेत सन 2025-26 साठीच्‍या अर्थसंकल्‍पाचे सविस्‍तर वाचन लेखापाल वैजनाथ स्‍वामी यांनी केले. अंदाजपत्रकानुसार नगर पंचायत माहूरला 1) दर व करापासुन 1,81,07,400/- रुपये, 2) विशेष वसुलीतुन 45,32,000/- रुपये, 3) महसुली उत्‍पन्‍नातुन 3,83,96,340/- रुपये, 4) शासनाकडून मिळणा-या अनुदानातुन 79,77,79,500/- ,5) संकीर्ण वसुलीतुन 81,48,439/- व 6) दलित वस्‍ती अनुदान व ईतर यामधुन 8,36,74,600/- व प्रारंभिक शिल्‍लक 8,09,060/- रुपये यासह नगर पंचायत माहूरला 95,14,47,339/- एवढा निधी अंदाजीत जमा होणे अपेक्षित असल्‍याची तरतुदी केल्‍या आहेत. तर नगर पंचायत माहूरने विविध विकास कामासाठी खर्च बाजुला 1) सामान्‍य प्रशासन व वसुली विभागासाठी 1,46,20,850/- , 2) सार्वजनिक सुरक्षीतेसाठी 3,08,48,500/-, 3) शहरातील नागरीकांसाठी रस्‍ते,नाली बांधकामे, सांस्‍कृतिक सभागृह बांधकामे विविध चौकांचे सुशोभिकरण करणेव ईतर बांधकामे तसेच आरोग्‍य व सेवा देणेसाठी 79,27,30,440/- 4) ग्रंथालय विभागासाठी 7,42,733/- ,5) संकीर्ण कामांसाठी 2,95,23,209/- तसेच 6) दलित वस्‍ती भागातील सांस्‍कृतिक सभागृह कामे व ईतर कामांसाठी 8,20,92,970/- असे एकूण 95,05,58,702/- एवढया अपेक्षित खर्च करण्‍याच्‍या तरतुदी असलेला व रक्‍कम रुपये 8,88,637/- एवढया रक्‍कमेचा शिल्‍लकी अर्थसंकल्‍प या सभेत मंजुर करण्‍यात आला.

     सदर अर्थसंकल्‍पावर सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली.या चर्चेत नगराध्‍यक्ष फिरोज कादर दोसानी, मुख्‍याधिकारी विवेक भारत कांदे, उपाध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर नारायण लाड, विद्यमान सदस्‍य तथा माजी नगराध्‍यक्ष राजेंद्र नामदेवराव केशवे, सदस्‍य तथा कॉग्रेस पक्षाचे गटनेते विलास बालाजीराव भंडारे, सदस्‍य तथा शिवसेना पक्षाचे गटनेते आशाताई निरधारी जाधव,सदस्‍य भाजपाचे गटनेते सागर सुधीर महामुने, तसेच सदस्‍य नंदा रमेश कांबळे,विजय शामराव कामटकर, सारीका देविदास सिडाम,  शकिलाबी शब्‍बीर सैय्यद, लतिफा मस्‍तान शेख,  सागर विक्रम राठोड, बिलकीसबेगम अहमंदअली शेख,अशोक कचरु खडसे, शीला रणधीर पाटील यांनी अर्थसंकल्‍पावरील चर्चेत सहभाग नोंदविला.

या अर्थसंकल्‍पा मध्‍ये विशेष प्राधान्‍याने विविध महापुरुषांच्‍या स्‍मारके विकसीत करणे, तिर्थस्‍थळांना जाणारे रस्‍ते विकसीत करणे,विकास योजनेतील रस्‍ते भुसंपादन करुन विकसीत करणे, मोठया नाल्‍याचे बांधकाम करुन शहरातील पाणी शहराबाहेर काढणे, ओपन स्‍पेस विकसीत करणे, उद्यान निर्मिती करणे,न.पं.प्रशासकीय इमारत बांधकाम करणे,वाचनालयाचे बांधकाम करणे, असे अनेक विकास कामे करण्‍याच्‍या तरतुदी करण्‍यात आल्‍या आहेत. यानंतर नगराध्‍यक्ष फिरोज दोसानी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणी चहा-पाना नंतर अर्थसंकल्‍पीय सभा संपल्‍याचे जाहीर केले. यावेळी नगर पंचायतचे लेखापाल वैजनाथ स्‍वामी,लेखापरिक्षक विशाल मरवाडे,CLTC विशाल ढोरे, C.C.मजहर शेख, सुरेंद्र पांडे, व ईतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post