किनवट : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकासह गाव स्तरावरील जिल्हा परिषद चे कर्मचारी नागरिकाच्या समस्या सोडविण्यासाठी किंवा आपले कर्तव्य बजविण्यात हलगर्जीपणा करतात यावर जालीम उपाय म्हणून एक वर्षांपूर्वी जिल्हा परिषद नांदेड च्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी AMS क्यूआर कोड प्रणाली सुरू करण्यात आली. पण जिल्हा परिषद च्या शिक्षण, आरोग्य, पंचायत समिती स्तर अशा सर्वच कर्मचाऱ्यांनी या मुख्याधिकारी यांच्या महत्त्वकांक्षी क्यू आर कोड प्रणालीची काही तांत्रिक अडचणीमुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. पण आता AMS QR कोड दैनंदिनी उपस्थिती निहाय देयके सादर करण्याचा आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद नांदेड शिक्षण विभागाकडून गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या पत्रात AMS QR कोड दैनंदिन उपस्थिती निहाय माहे फेब्रुवारी 2025 ची देयके या कार्यालयाकडे आग्रेषित करण्यास अवगत करण्यात आले होते परंतु AMS QR कोड प्रणालीद्वारे दैनंदिनीचा उपस्थिती गोषवारा न पाहता या कार्यालयाकडे देयके अग्रेषित केल्याचे दिसून येत आहे .
सदर संदेशाद्वारे गटशिक्षणाधिकारी यांना सुचित करण्यात आले की, AMS QR कोड प्रणालीतील दैनंदिन उपस्थितीचा अहवाल पाहूनच दैनंदिन उपस्थितीनुसार या कार्यालयाकडे प्रमाणपत्रासह देयके अग्रेषित करावीत . आजपर्यंत जिल्हास्तरावर जी देयके या कार्यालयाकडे आली होती ती सर्व देयके जिल्हास्तरावरून रद्द करण्यात आलेली आहेत.
तरी आपल्या अधिनिस्त सर्व शाळा / कार्यालयातील कर्मचारी यांची AMS QR कोड प्रणालीमध्ये नोंदविलेल्या दैनंदिन उपस्थितीनुसारच देयके या कार्यालयाकडे अग्रेषित करावीत.
ज्या तालुक्याचे प्रमाणपत्र येणार नाही त्या तालुक्याचे देयके. प्रमाणित केले जाणार नाहीत अशी तंबी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. जि.प.प्रशासक तथा मुख्याधिकारी यांचे सदरच्या धडाडीच्या निर्णयाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे.