जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे - प.पु.श्री दत्तपुरीजी महाराज
श्रीकांत राऊत, यवतमाळ
माहुर - येथील घनदाट जंगलात असलेल्या अतिप्राचीन यदुराज वनदेव संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे प.पू. समर्थ गुरुवर्य खुशाल पुरीजी महाराज यांच्या पुण्यतिथिनिमित्त माघ शुद्ध जया एकादशी दिनांक ०१ ते ८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजित अखंड दत्तनाम सप्ताहाला शनिवार (ता.०१) पासून सुरुवात करण्यात येत असून या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन मठाधिश तथा पुजारी प.पू. श्री दत्तपुरीजी महाराज यांनी केले आहे. या पुण्यतिथी सोहळ्यात दररोज सकाळी पाच वाजता तिर्थ स्थापना, काकड आरती, अखंड दत्त नामाचा जप तसेच माघ शुद्ध दशमी दिनांक ७ फेब्रुवारी शुक्रवारी रात्री ९ वाजता आनंद दत्त महापुजा श्रीफळांच्या पुजेला सुरवात करण्यात येईल दिनांक ८ फेबुरवारी रोजी शनिवारी काकड आरतीने या पुजेची सांगता करण्यात येणार असुन आठ वाजता समाधी अभिषेक महाआरती व सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत महाप्रसादाने या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे तरी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानचे पुजारी तथा मठाधिष प.पू. श्रीदत्तपुरी महाराज यांनी केले आहे.