उपोषण कर्त्याला मारहाण करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
वस्ती नसलेल्या ठिकाणी दाखविला निधी खर्च
आमसभेच्या प्रोसेडिंगमध्येही खाडाखोड..!
अचलपूर : तालुक्यातील अंजनगांव मार्गावर शहरापासून केवळ ३ कि.मी अंतरावर असलेली सावळी दातुरा ग्रामपंचायत ही ५० लाखाच्या कथित भ्रष्टाचाराने गाजत असून सदर प्रकरणातील उपोषण कर्त्याला मारहाण करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे माहिती सदर पुराव्याणीशी 'गावाकडची बातमी च्या हाती प्राप्त झाली आहे.
सदर अपहार प्रकरणी प्रहार संघटनेचा कार्यकर्ता असलेल्या निलेश विश्वासराव आखरे राहणार सावळी दातुराहयाने आमच्याकडे लेखी दिलेल्या तक्रारीत सावळी दातुरा येथील कामात ५० लक्ष रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचे म्हटले आहे.सावळी दातूरा येथेच गावालगत हायवे रोड टच शिवतीर्थ लेगसी सर्वे नंबर २७२ येथे एकही व्यक्ती राहत नसताना ग्रामपंचायत सावळी दातुरा येथील सरपंच, सचिव आणि काही भ्रष्ट कर्मचारी यांनी मिळून केलेला खूप मोठा घोळ घातला असून यात अचलपुर सार्वजनिक बांधकाम विभाभातील काही भ्रष्ट कर्मचारीही सहभागी असल्याचे म्हटले आहे.
निलेख आखरे याने ग्रामपंचायत मधील याच कथित भ्रष्टाचाराची लेखी तक्रार अचलपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दाखल केली आहे.
अचलपूर पंचायत समितीकडे दिलेल्या तक्रारीत सदर प्रकरणी ग्रामपंचायतीने चुकीचा ठराव करून त्या आधारे केवळ लोकेशन दाखवून शासनाच्या ५० लक्ष रुपयांच्या निधी हडप केल्याचे म्हटले आहे. प्राप्त कागपत्रांनुसार पंचायत समिती प्रशासनाने सावळी दातुरा ग्रामपंचायतला दिनांक ०६ आक्टोंबर २०२२ रोजी अभिन्यास विकास परवानगी आदेश दिलेले आहे.
त्यानुसार शिवतीर्थ लेगसी लेआउट मध्ये रस्ते, नाल्या व इलेक्ट्रिक पोलचे काम झाले आहे. त्याकरिता शेत गट नंबर २७२ एकूण क्षेत्रफळ ३.१२ निवासी प्रयोजनार्थ परवानगी देण्यात आली होती. ज्याअर्थी प्रशासनाने परवानगी दिली होती त्याअर्थी त्या जागेवर परवानगीपूर्व नियमानुसार रस्ते, नाल्या व इतर सामान्य नागरी सुविधा असायला हव्यात. परंतु जर तिथे रस्ते झाले होते तर त्याच जागेवर परत फेब्रुवारी २०२३ मध्ये सदर लेगसीमध्ये नवीन रस्ते शासनाच्या २५/५ निधी अंतर्गत येथे रस्ते बांधण्याची परवानगी दिली कशी हाच भ्रष्टाचार प्रकरणाचा कळीचा मुद्दा चर्चेत आहे.
जर येथे सुरुवातीला रस्ते झालेले आहे तर मग परवानगी कशी दिली..?
तर फक्त रस्त्याचे लोकेशन दाखवून ग्रामपंचायत सरपंच, सचिव, बांधकाम विभाग आणि सोबत लेआउट मालकासोबत संगनमत करून ५० लक्ष रुपये गडप केले असल्याची लेखी तक्रार प्रहार पदाधिकारी निलेश आखरे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व एमआरजीएसकडे केल्यानंतर पंचायत समिती प्रशानाने चौकशीचे आदेश दिल्याचे आम्हाला प्राप्त लेखी तक्रारी म्हटले आहे.
त्या चौकशीमध्ये तक्रार चौकशीचे वेळी, प्राप्त बयाने व उपलब्ध दप्तराचे नोंदीवरुन, ग्रामपंचायत सावळी दातुरा, मौजा खेलतपमाळी येथील भूमापन क्रमांक २७२ क्षेत्र ३.१३ हेक्टर आर या जमिनीवर, उपविभागीयअधिकारी अचलपुर यांचे आदेशान्वये खाजगी व्यक्तीचे निवासी प्रयोजनार्थ ले-आउट मंजूर करण्यात आले.
नियमानुसार नगर रचना विभागाचे अटी व शर्तीनुसार मंजुर ले-आउट मधे आवश्यक मुलभुत सुविधा असणे बंधनकारक आहेत.
अटी व शर्तीची परीपुर्तता झाल्यावरच सदर ले-आउट मधील भुखंडांच्या नोंदी नमुना नंबर ८ वर नोंद करुन घेणे अभिप्रेत आहे व त्यानुसार ग्रामपंचायतीने सदर लेआउट मधील भुखंडांच्या नोंदी करुन घेतलेल्या आहेत.
ग्रामपंचायतीने ग्रामसभा दिनांक ६ फेब्रुवारी२०२४ ठराव क्रमांक ७/६ अन्वये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून गावातील रस्ते बांधकामासाठी कुशल निधी मागणीचा ठराव पारीत करुन गावअंतर्गतचा कॉलनी परीसरातील रस्ता बांधकामांचे एकूण ६ लोकेशनची सदर ग्रामसभा ठरावात निवड केल्याचे दप्तराचे नोंदीवरुन दिसून येते.
सदर तहकुब ग्रामसभेत ०८ ग्रामसभा सदस्य उपस्थीत आहेत सदर लोकेशन मध्ये तक्रारीत नमुद असलेले खेलतपमाळी, सर्वे नंबर २७२ मधील थदानी ते शिवा फर्निचर पर्यंत व यादव ते अवंत ग्रेड पर्यंतचे रस्त्यांचे लोकेशन नमूद असल्याचे दिसुन आले.
यासंदर्भातील कामांचा प्रस्ताव ग्रामपंचायकडून दिनांक १५ फेब्रुवारी२०२३रोजी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपुर यांना सादर करण्यात आला.
त्यापुढील यंत्रणा सर्वाजनिक विभाग असून तक्रारीत नमूद स्थळावर रस्ता बांधकामे पूर्ण करण्यात येऊन बांधकाम झालेली मालमत्ता सरपंच ग्रामपंचायत सावळी दातुरा यांनी हस्तांतरीत करुन घेतल्याचे तक्रारकर्ते यांनी सादर केलेल्या पुराव्यावरुन दिसुन येते. ग्रामपंचायतीला या संबंधाने अनुदान प्राप्त नसुन त्रयस्त यंत्रणेकडून बांधकाम करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.